शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

१५ वर्षांपूर्वीच प्लॅस्टिक बंदीसाठी पाटील यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 1:55 AM

रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे.

जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पहिल्या महिला बेकरी उद्योजिका विद्या पाटील यांनी बेकरी व्यवसायांत अनेक मानदंड प्रस्थापित करीत असतानाच आपले पर्यावरणप्रेम देखील अगदी कसोशीने पाळले आहे. २००२च्या सुमारास प्लॅस्टिक कॅरिबॅगची पर्यावरणीय समस्या उग्ररूप धारण करून जगासमोर उभी राहिल्यावर, आपल्यापासूनच या समस्येला आळा घालण्याचा निर्णय घेवून विद्या पाटील यांनी २००२ पासून आपल्या मयूर बेकरीत कोणताही माल कोणत्याही ग्राहकाने खरेदी केल्यावर प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केले आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आगळा दृष्टिकोन १५ वर्षांपूर्वी सर्वांसमोर ठेवला आणि आज तो अत्यावश्यक बनला आहे.प्लॅस्टिक कॅरिबॅग देणे बंद केल्यावर काही काळ ग्राहकांकडून नाराजीचा सूर ऐकावा लागला, परंतु माझा माझ्या प्रत्येक ग्राहकाशी मुळात संवाद होता आणि ज्यांच्याशी नव्हता त्यांच्याशी मी तो जाणीवपूर्वक निर्माण केला. कॅरिबॅग वापराचे धोके त्यांच्या लक्षात आणून दिले.कॅरिबॅगच्या धोक्यांच्या बाबत एक पत्रक तयार करुन ते मी माझ्याकडे येणाºया प्रत्येक ग्राहकास देवून त्यांच्यात हा विचार रुजवला. ते पत्रक मोठे करुन माझ्या बेकरीत देखील लावले. कालांतराने माझे ग्राहक माझ्याशी सहमत झाले आणि स्वत:ची कापडी पिशवी घेवून बेकरीत खरेदीला येवू लागले, असा परिवर्तनाचा अनुभव विद्या पाटील यांनी सांगितला. काही वेळेस मोठी आॅर्डर असायची त्यावेळी मी त्या ग्राहकाला, माझ्याकडे आलेल्या कच्चा मालाच्या पुठ्ठ्याचे खोके देत असे. बेकरीत कॅरिबॅग ठेवतच नसल्याने देण्याचा प्रश्नच शिल्लक राहात नसे, असेही त्यांनी सांगितले.कॅरिबॅगची पर्यावरण समस्या ही अत्यंत गंभीर बनली आहे. तिला आळा घालण्याचे काम ती कॅरिबॅग घेणाºया ग्राहकापेक्षा, ती देणाºया व्यावसायिकानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. कॅरिबॅग दिली नाही म्हणून आपला व्यवसाय कमी होईल अशी काही वेळेस भीती व्यावसायिकास वाटते. परंतु आपल्याकडे येणाºया ग्राहकाशी काही क्षणांचा वेळ काढून जर व्यावसायिकाने संवाद साधला तर तो कॅरिबॅगचा हट्ट ग्राहक धरत नाही आणि आपल्या व्यवसायावर परिणाम देखील होत नाही, असे पाटील यांनी सांगितले.प्लॅस्टिक न वापरण्याच्या मानसिकतेचे वृद्धीकरणअमेरिका आणि सिंगापूरमध्ये खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूबरोबर स्वतंत्र कॅरिबॅग देण्यात येत असल्याचे तेथे पाहिल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे तेथे करिबॅगचा वापर अधिक आहे. प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणारी यंत्रणा तेथे आहे मात्र त्यावर सरकारी निधी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आपल्याकडे ते शक्य नाही.भारतात प्लॅस्टिक वापरायचे नाही, अशी अंगभूत मानसिकता मोठ्या प्रमाणात आजही आहे, ती मानसिकता वाढविण्याकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.तरुणाईने कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांत येणे गरजेचेमोठे मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि मोठी दुकाने येथे प्लॅस्टिक कॅरीबॅक वापर टाळण्यासाठी ग्राहक जागृतीचे उपक्रम करता येवू शकतात.महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: एनएसएस वा एनसीसीचे विद्यार्थी, युवा स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते, यांनी कॅरिबॅग मुक्ती प्रबोधन उपक्रमांतर्गत ग्राहकांशी या बाबत संवाद साधल्यास, बदल नक्की दिसून येईल असा विश्वास विद्यातार्इंनी अखेरीस व्यक्त केला.

टॅग्स :Raigadरायगड