आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 07:56 PM2023-08-22T19:56:20+5:302023-08-22T19:56:49+5:30

शुल्क परवडत नसल्याने स्थानिक विभागातील अनेक कार्गो माघारी धाडण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय 

Pay duty first and then export onion container cargo; Stiff stance of customs department | आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

आधी शुल्क भरा, त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा; सीमा शुल्क विभागाची ताठर भूमिका

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण : आधी शुल्क भरा त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा अशी ताठर भूमिका सीमाशुल्क विभागाने घेतल्याने कांद्याचे सुमारे ६० ते ७० स्थानिक कंटेनर माघारी गेले आहेत .तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरल्यानंतर कांद्याचे ४० कंटेनर कार्गो मंगळवारी (२२) निर्यातीच्या तयारीत असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत.शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०- ७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते.तर बंदराबाहेर परिसरातील विविध कंटेनर यार्डमध्ये राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी आलेले कांद्याचे सुमारे १२५ -१५० असे एकूण सुमारे २०० कार्गो कंटेनर  शनिवारपासून अडकून पडले आहेत.

कांदा नाशिवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार कंपन्यांचे सुमारे २० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. कांदा सडून जाण्याऐवजी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सीमाशुल्क विभागाने होल्ड करून ठेवलेले कांद्याचे २०० पैकी सुमारे ४० कार्गो कंटेनर मंगळवारी (२२) निर्यात होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा शनिवारी (१९)  अचानक निर्णय घेतल्याने जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्ड मध्ये सुमारे २०० कंटेनर कस्टम विभागाने होल्ड केले आहेत.कांदा सडून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.मात्र सीमा शुल्क विभागाची इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्यातीसाठी स्थानिक विभागातुन आलेले कांद्याचे सुमारे ६० ते ७० कंटेनर कार्गो व्यापाऱ्यांनी माघारी धाडले असल्याची माहिती  निर्यातदार आणि बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.तर केंद्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात असल्याचे न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Pay duty first and then export onion container cargo; Stiff stance of customs department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा