अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 02:52 AM2017-08-15T02:52:05+5:302017-08-15T02:52:09+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत

Peacock Front in Alibaug | अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

अलिबागमध्ये शेकापचा मोर्चा

Next

अलिबाग : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यातील जाचक अटींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असे येथील आ. सुभाष पाटील यांनी सांगितले. विविध मागण्यांसाठी शेकापच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरवर्षी हमीभाव भात खरेदीला सरकारकडून डिसेंबरमध्ये मंजुरी मिळते. त्यामुळे दलालांकडून शेतकºयांची लूट होते. शेतकºयांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. शेतकºयांच्या हितासाठी हमी भाव भात खरेदी १ आॅक्टोबर २०१७ पासून सुुरू करण्यात यावी, अशीही मागणी पाटील यांनी केली. अलिबाग, पेण, पनवेल, उरण या तालुक्यातील खारलॅण्ड विभागाने गेल्या पाच वर्षात बंधारे न बांधल्याने उधाणामुळे भातशेती नापीक झाली आहे. शेतांमध्ये कांदळवन तयार होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खारलॅण्ड शेतीचे योग्य संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाच्या जाचक अटी रद्द करून बंधारे बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कारखान्यातील सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, नावडे या नद्या प्रदूषित होऊ लागल्या आहेत. मासेमारी व बागायती शेती व्यवसायावर गदा येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यांवर कारवाई करून मच्छी व्यवसाय व बागायती शेतीचे रक्षण करावे, एमएमआरडीएने घोषित केलेला औद्योगिक क्षेत्र आराखडा रद्द करण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी शेकापच्यावतीने शेतकरी भवन येथून मोर्चा काढला.
>जिल्हाधिकाºयांना निवेदन
मोर्चात रायगड जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Peacock Front in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.