पेणच्या बाप्पांचा नाद नाय करायचा; मिळणार जीआय मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 06:21 AM2023-04-15T06:21:28+5:302023-04-15T06:22:01+5:30

गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेणारी मूर्तिकला, आखीव रेखीव रंगसंगतीमधील मूर्ती, हे पेणमधील मूर्तिकलेचे आकर्षण व वैशिष्ट्य आहे.

Pen ganpati idols will get GI rating | पेणच्या बाप्पांचा नाद नाय करायचा; मिळणार जीआय मानांकन

पेणच्या बाप्पांचा नाद नाय करायचा; मिळणार जीआय मानांकन

googlenewsNext

पेण :

गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेणारी मूर्तिकला, आखीव रेखीव रंगसंगतीमधील मूर्ती, हे पेणमधील मूर्तिकलेचे आकर्षण व वैशिष्ट्य आहे. पेणमधील गणेशमूर्ती कलेला लवकरच जीआय भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी चेन्नई येथील जीआर नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे आणि लवकरच ते मिळेल, असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्रातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

ग्रेट मिशन कन्सलसन्सी आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत जीआय मानांकन नोंदणीसाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबतीत येत्या काही दिवसांत अधिकृत माहिती उपलब्ध होईल. पेणची मूर्तिकला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली असल्याने कलादालनाच्या ८५० ते ९०० कार्यशाळेत याबाबत आनंदी वातावरण आहे.

पेणची मूर्ती कला स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे.  नामवंत मूर्तिकारांनी या कलेचा दर्जा वाढविला. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आज पेण व कलानगरी जोहे, हमरापूर विभागात  या कलेची नगरी मार्केट तयार झाले. पेणच्या मूर्तिकलेचे हे पेटंट देश विदेशातील ग्राहकांना परिचित आहे. गणेशभक्तांची पेणच्या मूर्तींबाबत फसवणूक होऊ नये यासाठी जीआय मानांकन प्राप्त करणेकामी जिल्हा उद्योग केंद्र प्रयत्नशील आहे. दरम्यान, पेणच्या सुबक गणेश मूर्ती जगभरात लोकप्रिय असून दरवर्षी कित्येक महिने आधीच बाप्पांच्या मूर्तीसाठी सांगून ठेवण्यात येते. आता या मूर्तींना जीआय मानांकन मिळणार आहे. 

पेणमधील गणेशमूर्तींची ओळख कायमस्वरूपी राहावी यासाठी चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. पाठपुरावा सुरू आहे. गणेशभक्तांची फसवणूक होऊ नये यासाठी या मानांकनाद्वारे पेणच्या गणेशमूर्तींची खरी ओळख समजेल. लवकरच याबाबत चांगली बातमी मिळेल.
- गु. श. हरळय्या, 
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

Web Title: Pen ganpati idols will get GI rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.