पेण रेल्वे धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:21 AM2018-08-16T02:21:47+5:302018-08-16T02:22:04+5:30

पेणच्या गणेशमूर्ती निर्मात्याच्या नगरीत जलद गाड्यांना थांबा मिळावा, तत्काळ शटल सेवा सुरू करावी. या प्रमुख मागण्यांसह मी पेणकर आम्ही पेणकर या मंचातर्फे पेणकर नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी पेण रेल्वेस्थानकांत मोर्चाने येऊन रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले.

 Pen Railway Strike Front | पेण रेल्वे धडक मोर्चा

पेण रेल्वे धडक मोर्चा

Next

पेण : पेणच्या गणेशमूर्ती निर्मात्याच्या नगरीत जलद गाड्यांना थांबा मिळावा, तत्काळ शटल सेवा सुरू करावी. या प्रमुख मागण्यांसह मी पेणकर आम्ही पेणकर या मंचातर्फे पेणकर नागरिकांनी स्वातंत्र्यदिनी पेण रेल्वेस्थानकांत मोर्चाने येऊन रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले. या वेळी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. सुमारे १५० नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.
पेणकरांची अनेक वर्षांची असलेली प्रमुख मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. मात्र, रोहा-दिवा पॅसेंजरला १२ ऐवजी १५ डबे, पेण स्थानकातून रिटर्न तिकीट सुविधा फलाटाची लांबी वाढविणे या सुविधा तुटपुंजा आहेत. त्यापेक्षा प्रशासनाने प्रमुख अशा मागण्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे होते. असे मोर्चेकऱ्यांचे म्हणले होते. त्यामुळे प्रशासनावर रोष प्रकट करीत मोर्चेकºयांनी आपला निषेध या आंदोलनाद्वारे व्यक्त केला.
पेण रेल्वेस्थानकांच्या अंतर्गत प्रवेशद्वारावर रेल्वे पोलिसांचे भक्कम कडे उभे होते. तर पेणच्या हद्दीत पेण पोलसांचे सुरक्षा कवच होते. एवढा भक्कम संरक्षण असल्यामुळे मोर्चेकºयांना रेल रोको करण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर मागण्याचे निवेदन देऊन मोर्चेकºयांनी आपले आंदोलन संपविले.

पेणकरांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
तत्काळ पेण-पनवेल शटल सेवा सुरू करावी.
रोजच्या रेल्वे अर्थात जलद गाड्या गणपती होळी व हॉलिडेच्या दिवसांत स्थानकांत दोन मिनिटे थांबाव्यात.
रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात रस्त्याची दुरुस्ती, पथदिवे व परिसर सुशोभीकरण करावे.
पेण स्थानकात पिण्याचे पाणी व महिला-पुरुष स्वच्छतागृहांची प्रत्येक फलाटात निर्मिती करावी.
प्रवासी विश्रांतिगृहांची सुविधा करण्यात यावी व इतर मागण्यांचे निवेदन या आंदोलनाप्रसंगी देण्यात आले बिगर राजकीय मोर्चा असल्याने या मोर्चामध्ये कमी उपस्थिती जाणवली.

Web Title:  Pen Railway Strike Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.