पेण अत्याचार, हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार - शंभुराजे देसाई, गृहराज्य मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 04:51 PM2020-12-31T16:51:47+5:302020-12-31T16:53:01+5:30

Pen rape and murder case : आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.

Pen rape, murder case advocate Ujjwal Nikam will be appoint - Home Minister Shambhuraje Desai | पेण अत्याचार, हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार - शंभुराजे देसाई, गृहराज्य मंत्री

पेण अत्याचार, हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार - शंभुराजे देसाई, गृहराज्य मंत्री

Next
ठळक मुद्देजास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल. जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

रायगड -  पेण मळेघरवाडी अत्याचार आणि हत्या  प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल. त्याचप्रमाणे या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पेण येथे दिली. या प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करण्यात येईल. जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल. जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.


पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकाेरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येतील. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य याेजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबराेबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर सरकारच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिले.याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते. 

Web Title: Pen rape, murder case advocate Ujjwal Nikam will be appoint - Home Minister Shambhuraje Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.