पेण बलात्कार, हत्या प्रकरण: उज्वल निकम यांचा युक्तिवाद पूर्ण; खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात
By राजेश भोस्तेकर | Published: November 30, 2023 01:16 PM2023-11-30T13:16:03+5:302023-11-30T13:16:26+5:30
४ डिसेंबरला आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद
अलिबाग : पेण शहरातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची घटना 29 डिसेंबर 2020 साली घडली होती. याबाबत अलिबाग जिल्हा न्यायालयात तीन वर्षापासून खटला सुरू आहे. या खटला अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवारी २९ नोव्हेंबर रोजी विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांचा खटल्यातील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. ऍड उज्वल निकम यांनी या खटल्यात २६ साक्षीदार यांची साक्ष नोंदवली आहे. ४ डिसेंबर रोजी आरोपी वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय निकालाची अंतिम सुनावणी तारीख देतील. असे ऍड उज्वल निकम यांनी माहिती दिली आहे.
पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उज्वल निकम याची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. जिल्हा सरकारी वकील ऍड भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.
जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर याच्या न्यायलायात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी २९ नोव्हेंबर रोजी खटल्याच्या सुनावणी साठी ऍड उज्वल निकम हे उपस्थित होते. ऍड उज्वल निकम यांनी या खटल्यातील अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. सुनावणी दरम्यान निकम यांनी २६ साक्षीदार यांची साक्ष नोंदवली आहे. ४ डिसेंबर रोजी आरोपी पक्षातर्फे वकील हे आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. खटल्यातील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. त्यामुळे खटल्याचा निकालाची तारीख न्यायालय मार्फत दिली जाणार आहे. त्यामुळे पेण बलात्कार व हत्याकांड प्रकरणाचा निकाल लवकरच न्यायलायतर्फे दिला जाणार आहे. ऍड भूषण साळवी यांनी निकम याच्यासोबत या प्रकरणात काम पाहिले. या निकालाकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.