पेण अर्बन बॅंक घोटाळा : शिशिर धारकर, प्रेमकुमार शर्मा यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 12:37 PM2018-12-01T12:37:58+5:302018-12-01T12:38:27+5:30

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर, तत्कालीन तज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मां यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

pen urban bank scam: Shishir Dharkar and Premkumar Sharma arrested | पेण अर्बन बॅंक घोटाळा : शिशिर धारकर, प्रेमकुमार शर्मा यांना अटक

पेण अर्बन बॅंक घोटाळा : शिशिर धारकर, प्रेमकुमार शर्मा यांना अटक

googlenewsNext

पेण : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर, तत्कालीन तज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मां यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. या दोघांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे, असे ईडीकडून सांगण्यात येत आहे.

पेण अर्बन सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या रकमेचे मनी लॉन्ड्रिंग केल्याप्रकरणी या दोघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याचा फटका बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. दरम्यान, याआधी शिशिर धारकर, प्रेमकुमार शर्मांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. 

पेण अर्बन सहकारी बँकेत गेल्या आठ वर्षांपूर्वी हा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या घोटाळ्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षण पथकाने 128 खाती बोगस असल्याचे अहवालामध्ये नमूद केले होते. यानंतर शिशिर धारकर आणि प्रवीण शर्मा हे या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. 
 

Web Title: pen urban bank scam: Shishir Dharkar and Premkumar Sharma arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.