पेण : पृथ्वीच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक चक्रावर ठिकठिकाणी अनिष्ट परिणाम झालेले दिसून येतात. सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी समूहांना अनेक राष्ट्रात जीवितहानीसह मोठ्या आर्थिक हानीचा सामना करावा लागतो. पृथ्वीवर येणारी ही नैसर्गिक संकटे रोखण्यासाठी झाडे वाचली पाहिजे, वनराईचे संरक्षण करण्याबरोबर सतत होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. सध्या कोकणात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते यासाठी पेणचा वनविभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील वनक्षेत्रात कडक प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी इक ोफ्रेंडली होळीचा सण साजरा करून राष्ट्राची संपत्ती असलेल्या वनांचे रक्षणाची जबाबदारी वनखात्याकडे आहे. हौसेपोटी वृक्षावर कुºहाडीचे घाव घालणारे हात थांबवावे. त्याचबरोबरीने झाडांचा पालापाचोळा, केळीची पाने, गोवºया याद्वारे पर्यावरणपूरक अशाप्रकारे होळीचा सण साजरा करावा, असे आवाहन पेण वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड यांनी केले.पेण वनविभागाची व्याप्ती सुमारे ९ हजार ९०० चौ. मी. असून या क्षेत्रात पानझडी जंगलाचा समावेश आहे. या क्षेत्रात सात राऊंड असून सात वनपाल व २५ वनरक्षकांद्वारे या वनांचे संरक्षण केले जाते. गेल्या काही वर्षांपासून शतकोटी वृक्षलागवडीमुळे, नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागले आहे. हौसमौज व उत्साहामुळे होळी सणाच्या वेळी विशेषत: कोकणात मोठ्या प्रमाणावर जी वृक्षतोड होत होती ते प्रमाण आता कित्येक पटीने कमी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. सध्या लोकांचा दृष्टिकोन बदलला असून पर्यावरणाला मारक ठरणाºया अनेक गोष्टी लोकांकडून बहिष्कृत होवू लागल्यात. हे चांगले सुलक्षण असून पर्यावरणपूरक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यावर शहरी भागातील नागरिकांनी भर दिला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून पर्यावरणपूरक होळीचा सण साजरा करण्यासाठी पेण वन विभागाच्या कार्यालयीन ग्राऊंडमध्ये गोवºया, पालापाचोळा, केळीची पाने यांचा वापर करून होळी सणाच्या इकोफे्रं डली डेमोचे प्रात्यक्षिक सादरीकरण वनविभाग व वृक्षप्रेमींतर्फे केले जात आहे.पर्यावरणपूरक होळी सण साजरा करण्यासाठी आम्ही व्यापक मोहीम हाती घेतली असून पेण शहर व ग्रामीण परिसरातील सरपंच, नागरी संकुलातील सोसायट्यांचे प्रमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रित करून शालेय विद्यार्थ्यांसमवेत पर्यावरणपूरक होळी डेमो सादरीकरणातून दिवसात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेद्वारे वृक्षतोड थांबविणे हाच उद्देश आहे.- प्रसाद गायकवाड,वनक्षेत्रपाल पेणवृक्ष हे मानवी जीवनाला आवश्यक असे प्राणवायू देणारे प्राणसंजीवक मित्र असल्याने सतत बदलणारे तापमान, येणाºया नैसर्गिक आपत्ती हे सर्व थांबवायचे असेल तर वृक्षतोड करू नये. होळीचा सण इकोफ्रेंडली साजरा करावा.- प्रा. उदय मानकवळे, वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते
पर्यावरण रक्षणासाठी पेण वनविभाग सरसावला; इकोफ्रेंडली होळीसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:37 PM