पेण मध्ये स्त्री-पुरु ष समानतेचा एल्गार

By admin | Published: January 4, 2016 02:02 AM2016-01-04T02:02:58+5:302016-01-04T02:02:58+5:30

अ..अ.. आईचा, ब..ब.. बहुराष्ट्रीय कंपनीचा, ग..ग.. गरिबिचा, स..स.. सावित्रीचा’ असा धडा पेणच्या सावित्रीच्या लेकींनी रविवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने गिरवला.

Penance of gender equality and gender equality | पेण मध्ये स्त्री-पुरु ष समानतेचा एल्गार

पेण मध्ये स्त्री-पुरु ष समानतेचा एल्गार

Next

अलिबाग : अ..अ.. आईचा, ब..ब.. बहुराष्ट्रीय कंपनीचा, ग..ग.. गरिबिचा, स..स.. सावित्रीचा’ असा धडा पेणच्या सावित्रीच्या लेकींनी रविवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने गिरवला.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री-पुरु ष समानता व त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी महिला अत्याचार विरोघी मंचच्या सदस्या मोहिनी गोरे व शैला धामणकर, अंकुर ट्रस्टचे राज पाटील उपस्थित होते. सावित्रीबाई फुले जयंतीच्या मुहूर्तावर ‘नई उमंग बेटी के संग’ व ‘बेटी झिंदाबाद’ या अभियानाच्या या उद्घाटनाच्या वेळी आदिवासी, शाळकरी मुली, कष्टकरी क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सावित्रीबार्इंना वंदन करून सरिता वाघमारे, कोमल आखाडे व सविता वाघमारे या तीन आदिवासी मुलींनी भाषणे करून रंगतच आणली. यंदाच्या महिला पतंगोत्सवात भाग घेण्यासाठी तयारी करणाऱ्या मुलींनी स्वत: बनवलेला आकाशदिवा पेटवून अभियानाची सुरु वात केली. शैला धामणकर यांनी अभियानाची रूपरेषा सांगितली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Penance of gender equality and gender equality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.