अलिबाग : पेण अर्बन बँकेच्या थकीत कर्ज वसुलीकरिता आता एकरकमी कर्ज परतफेड योजना शासनाने जाहीर केली आहे. योजनेकरिता २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत प्राप्त झालेल्या कर्जदारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार असल्याचे पेण अर्बन बँक प्रशासक शरद झरे यांनी दिलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.पेण अर्बन बँकेच्या थकीत कर्जदारांच्या प्रभावी वसुलीकरिता शासन निर्णयानुसार नागरी सहकारी बँकांना एक रकमी कर्ज परतफेड योजना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शनिवारी पत्रान्वये शासनाने जाहीर केलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मान्यता दिली आहे. ओटीएस योजनेंतर्गत मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एक महिन्यात तडजोडीची सर्व रक्कम भरणे आवश्यक आहे, ओटीएस योजनेंतर्गत मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एक महिन्याचे आत तडजोड रकमेच्या किमान २५ टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम पुढील जास्तीत जास्त ११ मासिक हप्त्यांत भरणे आवश्यक आहे. वाढीव कालावधीत हप्ता भरण्यास उशीर झाल्यास द.सा.द.शे. २ टक्के दंडव्याज आकारण्यात येईल,असे नमूद केले आहे. कर्जदाराने १ महिन्यात २५ टक्के रक्कम न भरल्यास या योजनेचा लाभ घेण्यास कर्जदाराने नकार दिला आहे असे समजून कर्जदाराने अर्जासोबत भरणा केलेली ५ टक्के रक्कम मुद्दलात जमा करु न घेतली जाईल. (प्रतिनिधी)प्रामाणिक कर्जदारांसाठीकर्जदाराने २५ टक्के रक्कम भरणा केल्यावर जास्तीत जास्त २४ महिन्यांत तडजोड रकमेचा भरणा अर्जदाराने न केल्यास, अर्जदाराला दिलेली सवलत रद्द करु न त्यांची यापूर्वी भरणा केलेली सर्व रक्कम प्रथम थकीत व्याजापोटी व नंतर मुद्दलापोटी वसुली करु न नियमित व्याजासह व इतर सर्व खर्चासह सर्व येणे रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घेण्यासाठी ही शेवटची संधी असल्याचे प्रशासक झरे यांनी म्हटले आहे.प्रामाणिक कर्जदारांकरिता ही चांगली योजना असून या योगे ६० कोटी रुपयांची वसुली होवू शकते अशी शक्यता ठेवीदार हक्क संरक्षण समितीचे समन्वयक नरेन जाधव यांनी सांगितले.
पेण अर्बन बँकेची एकरकमी कर्जफेड!
By admin | Published: January 29, 2017 2:21 AM