शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नागरिकांना घेणे गरजेचेच - जयपाल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 3:29 AM

आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे.

- आविष्कार देसाईआपत्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला आपत्तीचे प्रशिक्षण देण्यासाठी अलिबाग शहरातील एक अवलीया तसा प्रयत्न करत आहे. त्यांचे नाव आहे जयपाल पाटील. त्यांनी आजपर्यंत सुमारे २५ हजार नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत. यासाठी ते राज्यासह राज्याबाहेरही जाऊन नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगतात. त्याच आपत्तीच्या योद्ध्याशी थेट संवाद साधला.आपत्ती व्यवस्थापनावर कामकरावे असे का वाटले?अलिबाग तालुक्यातील काचळी येथे १९९१ साली पुराने थैमान घातला होता. आंबा नदीचे पाणी सर्वत्रच घुसले होते. त्या वेळी मी आरसीएफ कंपनीमध्ये नोकरीला होतो. आरसीएफ प्रशासनाने सामाजिक बांधिलकी म्हणून माझ्यासह अन्य सहकाऱ्यांना मदतीसाठी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वेळी गावातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. दहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर गाव उभे केले. त्यानंतर बºयाच वर्षांनी नागरी संरक्षण दल उरण येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यक असलेले प्रगत प्रशिक्षण सातत्याने घेत आहे. रायगड जिल्ह्याचा नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून कामही केले.नेमके कोणत्या प्रकारे आपत्तीव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देता?अपघात घडल्यावर जखमींना लगेच पाणी न पाजता सर्वप्रथम रुग्णवाहिका बोलवावी, आवश्यकता वाटल्यास अग्निशमन दल त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करावे. बुडलेल्यांना बाहेर काढल्यावर कोणता प्रथमोपचार द्यावा, गृहिणीचा जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो. त्यांनी गॅस, इलेक्ट्रिक उपकरण हाताना काळजी घ्यावी, साप, विंचू चावल्यावर कोणता प्रथम उपचार द्यावा, विषारी, बिनविषारी साप कसा ओळखावा याचे प्रशिक्षण दिले जाते.आपत्तीचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे या मताचा मी आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय, पोलीस पाटील, ग्रामसेवक, साखर कारखान्यातील कामगार, पोलीस दल, सुरक्षारक्षक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स, शेतकरी, शिक्षक, परिचारिका, डॉक्टर यांना तसेच मुंबई, सोलापूर, रत्नागिरी आकाशवाणीवरून आपत्ती व्यवस्थापनाची सुमारे २७१ व्याख्याने दिली आहेत.शिख रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्ररांची येथील शिख रेजिमेंटच्या १५० अधिकाºयांच्या पत्नींना आपत्तीचा मंत्र दिला आहे. आसाम-गोहत्ती, कर्नाटक हंप्पी येथील संपादक आणि पत्रकारांनाही आपत्तीचे महत्त्व सांगितले आहे. आजवर जेवढी प्रशिक्षण शिबिर पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ रुग्णवाहिका यांचा सिंहाचा वाटा आहे.

टॅग्स :Raigadरायगड