लोकाभिमुख प्रशासन राबवावे- सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:14 AM2017-08-04T02:14:40+5:302017-08-04T02:14:40+5:30
लोकाभिमुख प्रशासन राबविताना ते लोकांसाठी राबविले जाते, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी राबविले जाते हे लक्षात घेवून सर्व लोकसेवकांनी लोकाभिमुख प्रशासन राबविले पाहिजे
अलिबाग : लोकाभिमुख प्रशासन राबविताना ते लोकांसाठी राबविले जाते, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी राबविले जाते हे लक्षात घेवून सर्व लोकसेवकांनी लोकाभिमुख प्रशासन राबविले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी माणगाव येथे केले.
महसूल दिनानिमित्त माणगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्र माचा भाग म्हणून आॅनलाइन सातबाराचे उद्घाटन व वितरण करण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, आपल्या कार्यालयात कामानिमित्त येणाºया प्रत्येक व्यक्तीशी आपण सौजन्याने वागले पाहिजे. त्यांना सहकार्य केले पाहिजे. जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे. नवनवीन प्रकल्प जिल्ह्यात येत असून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाºयांनी उत्तम सेवा दिली पाहिजे असे नमूद के ले.
याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, कर्जत उप विभागीय महसूल अधिकारी दत्ता भडकवाड, पनवेल उप विभागीय महसूल अधिकारी भरत शितोळे आदी उपस्थित होते.