शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:26 AM

चोख पोलीस बंदोबस्त : पाच वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदान

नेरळ : मावळ लोकसभा मतदासंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेले मतदान लक्षात घेता कर्जत विधानसभा मतदारसंघाची विक्रमी मतदानाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे. ५ वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत मतदानाची टक्के वारी वाढली आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५६ टक्केमतदान झाले होते. यावर्षी कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार अशी शक्यता निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी मतदारांमध्ये उत्साह होता, त्यात वातावरणात असलेल्या प्रचंड उष्म्याने मतदारराजाने दुपारी घरीच बसणे पसंत केले. मात्र कार्यकर्त्यांकडून मतदारांना बाहेर काढण्यात यश आल्याने दुपारी एकनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दुपारी तीनपर्यंत ४८.०१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. उन्हाचा त्रास कमी झाल्याने दुपारी तीनपासून पाचपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी सहभाग घेत ६१.२२ टक्के मतांची नोंद झाली. त्यानंतर देखील मतदारांच्या रांगा वाढत राहिल्याने ७० टक्के मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा फायदा खासदार श्रीरंग बारणे की पार्थ पवार यापैकी कोणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे.

मतदानाला किरकोळ घटनांनी गालबोट लागले असून कर्जतचे आमदार सुरेश लाड, शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू घारे यांच्यासह अन्य आठ जणांवर मतदान केंद्राबाहेर मतदारांना आपल्या उमेदवारांच्या चिठ्ठ्या दिल्याबद्दल पोलिसांनी या तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत. त्यात कर्जत दहिवली येथे दोन, लाडीवली, पोसरी आणि मार्केवाडी येथे एक अशा पाच तक्रारी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत, तर डिकसळ येथे रजत म्हसे या मतदाराने मतदान केंद्रावर मोबाइल फोन नेण्यास बंदी असताना मोबाइल नेऊन आपला सेल्फी मतदान करीत असताना काढल्याबद्दल मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी या मतदाराविरुद्ध नेरळ पोलिसात तक्रार दिली आहे. कर्जत पोलीस ठाण्यातील पाच तक्रारी या मतदान केंद्र परिसरात आपल्या उमेदवारांचा प्रचार केल्याबद्दल नोंद करण्यात आल्या आहेत.कर्जत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुजाता तानवडे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव आणि माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक महादेव आचरेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. हजारहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात होते, त्यात राज्य राखीव पोलीस दल आणि सीआरपीएफचे कमांडो तैनात होते.

चौक परिसरात शांततेत मतदानमोहोपाडा : चौक परिसरात मतदान शांततेने पार पडले, मात्र व्हिलचेअर नसल्याने वयस्कर मतदारांचे हाल झाले. सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९ च्या दरम्यान मतदान केंद्र ९१ वावंढळ येथे व्हीव्हीपॅट मशिन बंद झाल्याने उन्हाचा तडाखा वाचविण्यासाठी आलेल्या मतदारांना सुमारे ५० मिनिटे रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. मशिन सुरू न झाल्याने या ठिकाणचे मतदान यंत्र बदलण्यात आल्यावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली, तर मतदान केंद्र ११२ आसरे येथे मशिन प्रक्रिया सुरू होण्यास काही मिनिटे उशिर झाला,मात्र त्याचा कोणताच परिणाम झाला नाही.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक