मतमोजणीसाठी सोपविलेली कामे चोख पार पाडावीत; बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:07 AM2019-05-16T00:07:37+5:302019-05-16T00:07:57+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी जिल्हा क्र ीडा संकुल नेहुली येथे होणार आहे. या दिवशी मतमोजणीसाठी ज्या ज्या विभागांवर तेथील कामकाजाची जी जबाबदारी सोपविलेली आहे ती कामे चोखपणे पार पाडावीत असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनुसार होणाºया अहवालाची झेरॉक्स कॉपी ठेवणे आवश्यक आहे. तसेच येथील वाहन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, येथे येणाºया कर्मचाऱ्यांची चहापान, नाष्टा, भोजन व्यवस्था, पाणी व स्वच्छता,अॅब्युलन्स व्यवस्था,मंडप व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यांची जबाबदारी ज्या ज्या विभागांवर सोपविलेली आहे, ती त्यांनी योग्यरीतीने पार पाडावी. यामध्ये काही हलगर्जी केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या. मतमोजणी ठिकाणी बसविण्यात येणाºया वातानुकूलित यंत्रणेचे कामकाज १९ मेपर्यंत पूर्ण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी आदींसह विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.