‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, तहसीलदारांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:11 AM2021-02-05T00:11:15+5:302021-02-05T00:13:03+5:30

Raigad News : महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हबिबा कॉम्प्लेक्स या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा आदेश महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी दिला आहे.

Perform structural audit of 'that' building, order of tehsildar | ‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, तहसीलदारांचा आदेश

‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, तहसीलदारांचा आदेश

Next

बिरवाडी - महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हबिबा कॉम्प्लेक्स या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा आदेश महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी दिला आहे. स्ट्रक्चर ऑडिटच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र महाविद्यालयातील सिव्हिल विभागांतील अभियंत्यांमार्फत बिरवाडीमधील हबिबा कॉम्प्लेक्स इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता बिरवाडीमधील इब्राहिम माटवणकर यांनी आपल्या मालकीच्या जागेत निवासी व वाणिज्य वापरातील इमारत उभारली आहे. त्या इमारतीतमधील सर्वाधिक गाळे व निवासी खोल्यांची मालकी इब्राहिम माटवणकर यांच्याकडेच आहे, तर काही गाळे व निवासी खोल्या विकत घेतलेल्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीने नोटीस देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे सूचित केले आहे, अशी माहिती घाडगे यांनी दिली आहे.

महाडमधील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीकडून झाली नसल्याचे हबिबा कॉम्प्लेक्स प्रकरणावरून दिसून येत आहे. 

रहिवाशांकडून कोणतीही तक्रार नाही
बिरवाडीमधील हबिबा कॉम्प्लेक्स ही इमारत धोकादायक आहे किंवा नाही? याचा फैसला हा स्ट्रक्चर ऑडिटच्या अहवालानंतर होणार असला तरी सोशल मीडियावरील वृत्ताच्या आधारे हबिबा कॉम्प्लेक्स इमारत चर्चेत आली, त्या वृत्तातील सत्यता पडताळणी करण्यासाठीच स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय तहसीलदार सुरेश काशीद यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या इमारतीमधील रहिवाशांनी इमारत धोकादायक असल्याची कोणतीही तक्रार .
ग्रामपंचायत अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयांकडे केलेली नाही. असे असताना केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्ताच्या आधारे तहसीलदार सुरेश काशीद यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे. बिरवाडीमध्ये नियमांची पायमल्ली करून चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला स्थगिती देऊनसुद्धा काम सुरू आहे. मात्र, याठिकाणी राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करण्यास विलंब होत असल्याची बाब समोर येत आहे.

Web Title: Perform structural audit of 'that' building, order of tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी