अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राची परवानगी, दिलीप जाेग यांच्या आंदाेलनाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:28 AM2021-01-31T00:28:33+5:302021-01-31T00:29:02+5:30

Alibag-Wadkhal road News : पीएनपी जंक्शन, धरमतर पूल ते जेएसडब्ल्यू धरमतर गेट ते रेल्वे अंडरपास ते धरमतर पोलीस चौकी ते वडखळ नाका सकर्लसह रस्त्याचे काँक्रिटीकरण पीएनपी आणि जेएसडब्ल्यू या खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून करावे, अशी मागणी खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग यांनी या कंपन्यांकडे केली हाेती.

Permission of Center for repair of Alibag-Wadkhal road | अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राची परवानगी, दिलीप जाेग यांच्या आंदाेलनाला यश

अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्राची परवानगी, दिलीप जाेग यांच्या आंदाेलनाला यश

Next

 रायगड : वडखळ-अलिबाग रस्त्याची झालेली दुरवस्था आता काही लपून राहिलेली नाही. या मार्गावरून प्रवास करणे आता चांगलेच जिकिरीचे झाले आहे; मात्र प्रशासन, सरकार आणि लाेकप्रतिनिधी यांना त्याबाबत काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते. येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाेग यांनी २६ जानेवारी राेजी आंदाेलन केले हाेते. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा रस्ता जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्यास मंजुरी दिली आहे.

वडखळ-अलिबाग हा रस्ता सुसाट होणार, २१ मिनिटात अलिबागवरून वडखळला पोहोचता येणार, अशी विविध स्वप्ने येथील राजकारण्यांनी जनतेला दाखविली; पण तो रस्ता वाहतुकीसाठी निटनेटका करणेही कोणाला जमले नाही. परंतु अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांच्या आंदाेलनाला यश आले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून रस्ता करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिल्याचे लेखी पत्रच नॅशनल हायवे ॲथोरिटीने दिलीप जोग यांना पाठविले आहे. जोग यांनी या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी २६ जानेवारीला जेएसडब्ल्यू कंपनीसमोरील चेकपोस्टवर जनआंदोलन केले होते.

पीएनपी जंक्शन, धरमतर पूल ते जेएसडब्ल्यू धरमतर गेट ते रेल्वे अंडरपास ते धरमतर पोलीस चौकी ते वडखळ नाका सकर्लसह रस्त्याचे काँक्रिटीकरण पीएनपी आणि जेएसडब्ल्यू या खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून करावे, अशी मागणी खड्डे ॲक्टिव्हिस्ट दिलीप जोग यांनी या कंपन्यांकडे केली हाेती. तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी, रायगड, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडेही मागणी केली होती. जोग यांनी त्यांच्या निवेदनामध्ये वडखळ-अलिबाग या चारपदरी रस्त्याचे काम रद्द झाले आहे. या रस्त्यावर सर्वात जास्त वाहतूक पीएनपी, धरमतर पोर्ट इन्फ्रा आणि जेएसडब्ल्यू कंपनींच्या ओव्हरलोड ट्क, ट्रेलरची सुरू असते. त्यामुळे या कंपन्यांनीच त्यांच्या सीएसआर फंडातून निधी खर्च करून उत्त्तम दर्जाचे काँक्रिटचे रस्ते ठेकेदारांना न देता स्वतः करावेत, अशी मागणी केली होती. कंपन्यांनी त्यांच्या आसपासचे हे वर्दळीचे  रस्ते कंपनीला तसेच लोकांनाही फायदयाचे असणारे केले तर, जनता  आभारी राहील, असे दिलीप जोग यांनी सांगितले होते.

प्रकल्प संचालकांचे पत्र
जोग यांच्या प्रयत्नांना यश येऊन नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक प्रशांत फेगडे यांनी त्यांना लेखी पत्र दे‌ऊन या रस्त्याची दुरूस्ती नॅशनल हायवेच्या नियमांनुसार जेएसडब्ल्यू यांना त्यांच्या सीएसआर फंडातून करण्यास विशेष बाब म्हणून परवानगी दिली असल्याचे कळवले आहे. लवकरच आता प्रवशांची खड्ड्येमय प्रवासातून सुटका हाेणार आहे. परंतु रस्ते तरार करताना संबंधितांनी रस्त्याचा दर्जा राखावा आणि ते रस्ते जास्त कालावधीपर्यंत टिकतील, असेच निर्माण करावेत, अशी माफक अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Permission of Center for repair of Alibag-Wadkhal road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.