शाब्दिक चुकीमुळे रखडली होती परवानगी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 02:20 AM2020-12-08T02:20:31+5:302020-12-08T02:20:58+5:30

Raigad News : २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता.

Permission was delayed due to a literal error | शाब्दिक चुकीमुळे रखडली होती परवानगी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

शाब्दिक चुकीमुळे रखडली होती परवानगी, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा

Next

अलिबाग : पर्यटन व्यवसायाला परवानगी देताना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेश पत्रातील एका छोट्याशा शाब्दिक चुकीमुळे जलक्रीडा व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला होता. अखेर ही चूक शब्दांच्या रचनेमुळे झालेली आहे, असा खुलासा करत, जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांनी जलक्रीडा व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

२० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. वास्तविक, या ठिकाणी ''रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे'' असा शब्द वापरणे आवश्यक होता. किनारपट्टीचे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये समुद्र किनारे नाहीत. त्याचबरोबर, मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्याने तेथे जलक्रीडा प्रकारांना परवानगी देण्यात आलेली नाही. इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देता येत नसल्याने बंदर विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शविला होता.

या शाब्दिक चुकीमुळे बंदर विभागाने रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा प्रकारांना परवानगी नाकारली होती. अखेर जलक्रीडा व्यावसायिक अलिबाग येथील शिवनाथ पाटील, परेश पाटील, अमित पेरेकर, नागाव येथील प्रफुल्ल बानकर यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समक्ष जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेत  परवानगी मिळण्यासाठी विनंती  केली होती.  

व्यावसायिकांना दिलासा
सर्व प्रकार शाब्दिक रचनेमुळे  झालेला असून, बंदर विभागाला  याची अंमलबजावणी करणे गरज असल्याचे जिल्हाधिकारी निधी  चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मागील २० नोव्हेंबरला आदेश  मिळूनही व्यवसाय सुरू न करू शकलेल्या  रायगडमधील जलक्रीडा व्यावसायिकांना मोठा दिलासा 
मिळाला आहे. 
 

Web Title: Permission was delayed due to a literal error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड