अपंगांचे दाखले अधिकाºयांनी द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:30 AM2017-08-02T02:30:07+5:302017-08-02T02:30:07+5:30

अपंग व्यक्तींना देण्यात येणारे दाखले तालुकास्तरावर अधिकारीवर्गाने भेट देऊन द्यावेत, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन,

The persons with disabilities should be given the certificate | अपंगांचे दाखले अधिकाºयांनी द्यावेत

अपंगांचे दाखले अधिकाºयांनी द्यावेत

Next

पोलादपूर : अपंग व्यक्तींना देण्यात येणारे दाखले तालुकास्तरावर अधिकारीवर्गाने भेट देऊन द्यावेत, अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेऊन, निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे.
अपंग व्यक्तींना दिले जाणारे दाखले हे प्रत्येक जिल्ह्याच्या शैल्यचिकित्सक यांच्यामार्फत दिले जातात. रायगड जिल्ह्यातील अपंग व्यक्तीला दाखले घेण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रु ग्णालयात जावे लागते, त्यातच महाड, पोलादपूर हे तालुके अतिदुर्गम असल्याने २०० ते ३०० कि.मी.चे अंतर प्रवास करून जावे लागते, त्यामुळे त्यांनाएवढा प्रवास करणे शक्य नसल्याने अपंगांना दाखल्याविना अनेक लाभांपासून वंचित राहावे लागते. याकरिता महिन्यातून एकदा तालुकास्तरावर महाड येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखले देण्याकरिता तारीख निश्चित करण्याकरिता संबंधितांना आदेश देण्याची मागणी केली आहे.

Web Title: The persons with disabilities should be given the certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.