वन विभागाविरोधात याचिका दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 11:09 PM2019-01-13T23:09:09+5:302019-01-13T23:09:40+5:30

उरण-मोठी जुईमधील ग्रामस्थ आक्रमक : पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न

The petition will be filed against the forest department | वन विभागाविरोधात याचिका दाखल करणार

वन विभागाविरोधात याचिका दाखल करणार

Next

अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल आणि उरण तालुक्यातील जमिनींना चांगलेच दर आले आहेत. जमिनींच्या माध्यमातून अमाप पैसा मिळत असल्याने काहींनी सरकारी वन जमिनींवरही कब्जा केला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी उरण तालुक्यातील मोठी जुई येथील वन जमिनी अबाधित राहाव्यात, यासाठी ग्रामस्थांनी वन प्रशासनाला साकडे घातले आहे. वन विभागाने गुन्हे दाखल केल्याचे नुसते कागद रंगवले. मात्र, कारवाई शून्य केली आहे. वन प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. प्रशासन सातत्याने तोंडाला पाने पुसत असल्याची त्यांची धारणा झाली आहे. त्यांच्या या बेफिकीर कारभारा विरोधात ग्रामस्थ याचिका दाखल करणार असल्याने प्रशासनासह जमिनी बळकावणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


ग्रामस्थांनी जिल्हा वन प्रशासनाला अल्टिमेटम देण्यासाठी शुक्रवारी पुन्हा एकदा निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. संरक्षित वनांच्या जागेत बेकायदेशीरपणे झाडे तोडून वनविभागाचे असलेले बुरूज हटवून त्या वन जमिनी लाटण्याचा प्रकार मौजे मोठी जुई-उरण गावालगतच्या मौजे कोप्रोली आणि कळंबुसरे गावाच्या लगत सुरू आहे. वन विभागाच्या सर्व्हेे नं. ३४६ व सर्व्हे नं. १२२ मध्ये मे.दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि.ने बेकादेशीरपणे मातीचा भराव टाकण्यात येत आहे. असे प्रकार सर्रास सुरू असल्याने वन प्रशासनाने डोळ््यावर कातडी ओढल्याची ग्रामस्थांची धारणा झाली आहे. असे प्रकार डोळ््यादेखत घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहे.


मौजे कोप्रोली येथील राखीव वनपरिक्षेत्रात मालकी मिळकत सर्व्हे नं. २८ लगत वनजमिनींवर बेकायदेशीर उत्खनन करणाºयांच्या विरोधात आपण तत्काळ पंचनामा करून गुन्हा दाखल करावा. याबाबत जिल्हा कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारीसोबत फोटोही जोडले होते, मात्र कोणतीही कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. या तक्रारी ग्रामस्थांनी ९ आणि १२ जानेवारी २०१८ रोजी म्हणजेच एक वर्षापूर्वी केल्या होत्या.


त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र वनअधिकारी उरण, सहायक वनसंरक्षक पनवेल यांना अर्ज करून स्थळ पाहणीसह पंचनामे करण्याची विनंती केल्याचेही अर्जात म्हटले आहे. मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिक आणि संबंधित ठेकेदारांविरोधात वनसंरक्षक कायद्याचा भंगाचा गुन्हा नोंदविण्याबाबतचा उल्लेख तक्रार अर्जात आहे. या तक्रार अर्जावर कारवाईसाठी १७ जानेवारी २०१८ रोजी परिक्षेत्र वनअधिकारी उरण व सहायक वनसंरक्षक पनवेल हे घटनास्थळी आले होते. पंचनामा करण्याच्या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थ नीतेश पाटील यांनी सांगितले.


सध्या मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिकच्या वतीने बेकायदा सूर्य मावळल्यानंतरही संरक्षित वनांच्या जागेत बेकायदा झाडे तोडून भराव केला जात आहे. वन विभागाच्या सीमा रेषेवर असणारे पिलर पुढे सरकवून डोंगर फोडून संरक्षित वनांच्या जागेमध्ये सुमारे १५ मीटर आतमध्ये बेकायदा अतिक्र मण केल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

पाहणी करून करणार कारवाई
२०१७ रोजी वन प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी, वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून भराव करण्यात येत आहे. वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतापलेले आहेत.
गरीब शेतकºयांनी वन जमिनीमध्ये गुरांच्या निवाºयासाठी शेड उभारली तर ती तातडीने तोडण्यात येते, मात्र धनिकांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अ‍ॅड.राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणी स्थळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अलिबाग येथील जिल्हा वनसंरक्षक कार्यालयाने आश्वासित केल्याचेही अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: The petition will be filed against the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.