शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वन विभागाविरोधात याचिका दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 11:09 PM

उरण-मोठी जुईमधील ग्रामस्थ आक्रमक : पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न

अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल आणि उरण तालुक्यातील जमिनींना चांगलेच दर आले आहेत. जमिनींच्या माध्यमातून अमाप पैसा मिळत असल्याने काहींनी सरकारी वन जमिनींवरही कब्जा केला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी उरण तालुक्यातील मोठी जुई येथील वन जमिनी अबाधित राहाव्यात, यासाठी ग्रामस्थांनी वन प्रशासनाला साकडे घातले आहे. वन विभागाने गुन्हे दाखल केल्याचे नुसते कागद रंगवले. मात्र, कारवाई शून्य केली आहे. वन प्रशासनाच्या या भूमिकेमुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. प्रशासन सातत्याने तोंडाला पाने पुसत असल्याची त्यांची धारणा झाली आहे. त्यांच्या या बेफिकीर कारभारा विरोधात ग्रामस्थ याचिका दाखल करणार असल्याने प्रशासनासह जमिनी बळकावणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ग्रामस्थांनी जिल्हा वन प्रशासनाला अल्टिमेटम देण्यासाठी शुक्रवारी पुन्हा एकदा निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. संरक्षित वनांच्या जागेत बेकायदेशीरपणे झाडे तोडून वनविभागाचे असलेले बुरूज हटवून त्या वन जमिनी लाटण्याचा प्रकार मौजे मोठी जुई-उरण गावालगतच्या मौजे कोप्रोली आणि कळंबुसरे गावाच्या लगत सुरू आहे. वन विभागाच्या सर्व्हेे नं. ३४६ व सर्व्हे नं. १२२ मध्ये मे.दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि.ने बेकादेशीरपणे मातीचा भराव टाकण्यात येत आहे. असे प्रकार सर्रास सुरू असल्याने वन प्रशासनाने डोळ््यावर कातडी ओढल्याची ग्रामस्थांची धारणा झाली आहे. असे प्रकार डोळ््यादेखत घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

मौजे कोप्रोली येथील राखीव वनपरिक्षेत्रात मालकी मिळकत सर्व्हे नं. २८ लगत वनजमिनींवर बेकायदेशीर उत्खनन करणाºयांच्या विरोधात आपण तत्काळ पंचनामा करून गुन्हा दाखल करावा. याबाबत जिल्हा कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रारीसोबत फोटोही जोडले होते, मात्र कोणतीही कारवाई केली नसल्याचे ग्रामस्थांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. या तक्रारी ग्रामस्थांनी ९ आणि १२ जानेवारी २०१८ रोजी म्हणजेच एक वर्षापूर्वी केल्या होत्या.

त्याचप्रमाणे वनपरिक्षेत्र वनअधिकारी उरण, सहायक वनसंरक्षक पनवेल यांना अर्ज करून स्थळ पाहणीसह पंचनामे करण्याची विनंती केल्याचेही अर्जात म्हटले आहे. मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिक आणि संबंधित ठेकेदारांविरोधात वनसंरक्षक कायद्याचा भंगाचा गुन्हा नोंदविण्याबाबतचा उल्लेख तक्रार अर्जात आहे. या तक्रार अर्जावर कारवाईसाठी १७ जानेवारी २०१८ रोजी परिक्षेत्र वनअधिकारी उरण व सहायक वनसंरक्षक पनवेल हे घटनास्थळी आले होते. पंचनामा करण्याच्या विनंतीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थ नीतेश पाटील यांनी सांगितले.

सध्या मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिकच्या वतीने बेकायदा सूर्य मावळल्यानंतरही संरक्षित वनांच्या जागेत बेकायदा झाडे तोडून भराव केला जात आहे. वन विभागाच्या सीमा रेषेवर असणारे पिलर पुढे सरकवून डोंगर फोडून संरक्षित वनांच्या जागेमध्ये सुमारे १५ मीटर आतमध्ये बेकायदा अतिक्र मण केल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.पाहणी करून करणार कारवाई२०१७ रोजी वन प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी, वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करून भराव करण्यात येत आहे. वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतापलेले आहेत.गरीब शेतकºयांनी वन जमिनीमध्ये गुरांच्या निवाºयासाठी शेड उभारली तर ती तातडीने तोडण्यात येते, मात्र धनिकांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अ‍ॅड.राकेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार संबंधित ठिकाणी स्थळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अलिबाग येथील जिल्हा वनसंरक्षक कार्यालयाने आश्वासित केल्याचेही अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल