अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

By राजेश भोस्तेकर | Published: January 2, 2024 08:21 AM2024-01-02T08:21:22+5:302024-01-02T08:22:22+5:30

पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती.

petrol shortage in alibaug city there were queues at the petrol pump since evening | अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : हिट अँड रन हा अपघात बाबत केलेल्या नव्या कायद्यामुळे वाहतूक व्यवसायिक आक्रमक झाले आहेत. वाहतूकदार यांनी संप पुकारला असल्याने पेट्रोल सह जीवनावश्यक साहित्याची वाहतूक ठप्प झाली आहे. पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळ पासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातही ही परिस्थिती पाहायला मिळाली. अलिबागमध्ये मंगळवार सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहन चालकांची रीघ लागली होती. मात्र पेट्रोल संपल्याने चालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे लवकर संप मिटवावा अशी मनीषा वाहन चालक करीत आहेत. 

सरकारने हिट अँड रन बाबत नवीन कायदा केला आहे. या कायद्यामुळे वाहतूकदार व्यवसायिकांना फटाका बसणार असून या कायद्याला व्यवसायिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे वाहतूक दार संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. तसाच वाहन चालकांनाही फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. संप सुरू झाल्यानंतर पेट्रोल टंचाई सुरू होईल अशी बोंब झाल्याने सोमवारी सायंकाळ पासून अलिबाग मधील पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

अलिबागमध्ये एच पी, भारत पेट्रोलियम, रिलायन्स असे पेट्रोल पंप आहेत. सायंकाळपासून पेट्रोल भरण्यास नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे शहरातील चारही पंपावर पेट्रोल संपले आहे. त्यामुळे शहरात आता पेट्रोलच्या खणखणात झाला आहे. त्यामुळे संप कधी संपणार याकडे वाहन चालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: petrol shortage in alibaug city there were queues at the petrol pump since evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.