किल्ले रायगडचा सचित्र ठेवा पंतप्रधानांकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:52 AM2018-02-23T02:52:01+5:302018-02-23T02:52:14+5:30

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दुर्गदुर्गेश्वर रायगडची इत्थंभूत माहिती देणारे ‘राजधानी रायगड’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

The photographs of the fort Raigad are handed over to the Prime Minister | किल्ले रायगडचा सचित्र ठेवा पंतप्रधानांकडे सुपूर्द

किल्ले रायगडचा सचित्र ठेवा पंतप्रधानांकडे सुपूर्द

Next

नवी मुंबई : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने दुर्गदुर्गेश्वर रायगडची इत्थंभूत माहिती देणारे ‘राजधानी रायगड’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेल्या रायगडची माहिती देशातील प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. याच भावनेतून हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेट देण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमिपूजनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, आमदार मंदा म्हात्रे यांनी हेलिपॅडवर स्वागत केले. या वेळी जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पंतप्रधानांना राजधानी रायगड पुस्तक भेट दिले. देशाचे पंतप्रधान महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना प्रशासनाच्यावतीने दिलेल्या पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजधानी रायगड या पुस्तकामध्ये नक्की काय आहे याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. रायगड किल्ल्याची माहिती देणारी ५० पेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेले पुस्तक लक्ष वेधून घेत आहे. विद्यमान ठाणे जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. कॉपी टेबल बुक असे स्वरूप असले तरी राज्यातीलच नव्हे देशातील प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक असलेच पाहिले एवढी चांगली माहिती व छायाचित्रे त्यामध्ये आहेत. रायगड किल्ल्याची भौगोलिक माहिती, इतिहास, तेथील महत्त्वाच्या घडामोडी, पाचाडमधील राजमाता जिजाऊ समाधी, पाचाडचा राजमातांचा वाडा, नाणे दरवाजा, वाघबिळपासून सर्व माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.
राजधानी रायगडच्या मुखपृष्ठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेले छायाचित्र वापरले आहे. ११ व्या शतकापासून ते १९३५ पर्यंतच्या किल्ल्यावरील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती दिली आहे. रायगडावर जाण्यासाठीचे मार्ग, रायगडावरील सर्व वास्तू, तलावांची छायाचित्रे व त्यांचे थोडक्यात वैशिष्ट्य देणारी माहिती दिली आहे. रायगडावरील महादरवाजा हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. पुस्तकामध्ये दरवाजाच्या छायाचित्रांसह त्याच्या वैशिष्ट्यांची माहिती आहे. महादरवाजाची एस आकाराची तटबंदी तयार करण्यामागील भूमिकाही स्पष्ट केली आहे. गडावर तेव्हा केलेले जलव्यवस्थापन, तलाव व १४ टाक्या या सर्वांची माहिती या पुस्तकामध्ये आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे मनोगतही दिले आहे.

माहिती व जनसंपर्क विभाग अत्यंत परिश्रमपूर्वक अनेक प्रकाशने काढत असते. यासाठी मुख्यमंत्र्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन होत असते. यामधील काही प्रकाशने देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहचल्याचा सर्वांना आनंद आहे.
- गणेश मुळे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक
काय आहे पुस्तकामध्ये?
रायगडचे भौगोलिक वैशिष्ट्य, महत्त्वाच्या घडामोडी, प्राचीन महत्त्व, पूर्वेतिहास, रायगडचे महत्त्व, गडावर जाणारे मार्ग, घेरा रायगड, पाचाडकोट, किल्ले रायगड दर्शन, गडावरील वास्तुशिल्पे, द्वारे शिल्पे, प्रवेशमार्ग, तटबंदी, बुरूज व तोफा, दारूगोळ्याचे कोठार व धान्यकोठ्या, जलव्यवस्थापन, राज्याभिषेक स्थित्यंतरे, बालेकिल्ला, मेघडंबरी, होळीचा माळ, राजदरबार, शिवराज्याभिषेक सोहळा, नगारखाना, पेठा, टकमक टोक, लोहस्तंभ, मनोरे, मंदिरे व मूर्ती, अष्टप्रधान मंडळ व कचेºया, शिवकालीन चलन व राजमुद्रा, पावसाळ्यातील रायगड व जैवविविधता याविषयी माहिती पुस्तकात आहे.

Web Title: The photographs of the fort Raigad are handed over to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.