पिकअप-ट्रेलरची धडक; वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:09 PM2019-05-24T23:09:44+5:302019-05-24T23:10:45+5:30

माणगाव : तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल रायगड दर्शन जवळ पिकअप व ट्रेलरची समोरा समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही ...

Pickup-trailer strikes; Vehicle Damages | पिकअप-ट्रेलरची धडक; वाहनांचे नुकसान

पिकअप-ट्रेलरची धडक; वाहनांचे नुकसान

माणगाव : तालुक्यातील गारळ गावच्या हद्दीत हॉटेल रायगड दर्शन जवळ पिकअप व ट्रेलरची समोरा समोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही चालकांना किरकोळ दुखापत झाली, तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.


फिर्यादी अहमद उल्ला (२१, रा. कळंबोली) यांच्या ताब्यातील ट्रेलर क्र. एम एच ४६/बी बी/ ०२८३ हे न्हावाशेवा ते महाड असे मुंबई-गोवा माहमार्गावरून घेऊन जात असताना २३ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मौजे गारळ येथे हॉटेल रायगड दर्शन जवळ आले, त्या वेळी महाडकडून मुंबई बाजूकडे जाणारी पिकअप क्र. एम एच ०८/डब्लू/ ३२९५ ने चुकीच्या दिशेला येऊन ट्रेलरला समोरासमोर ठोकर मारली, यानंतर ट्रेलर डाव्या बाजूला घेत असताना स्लिप होऊन पलटी झाला. या अपघातामध्ये दोन्ही चालकांना किरकोळ दुखापती होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत माणगाव पोलीस ठाण्यामध्ये मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार धुपकर करीत आहेत.


आंबेत घाटात गाडीने घेतला पेट
आंबेत घाटात गाडीतून धूर येऊन, गाडीने अचानकपणे पेट घेतल्याने यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. नितिश लक्ष्मण धुमक (३०, रा. पोयनार, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे एम.एच.०२, एव्ही-२५९० ही कार घेऊन अलिबाग ते पोयनार असे जात असताना, गाडी आंबेत घाटात आल्यानंतर गाडीतून अचानक धूर येऊ लागला. धुमक यांनी गाडी थांबवून, बॉनेट उघडण्यासाठी गेले असता, गाडीने पेट घेतला. या आगीमध्ये ही गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोरेगाव पोलीसठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Pickup-trailer strikes; Vehicle Damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.