दिवेआगर-भरडखोल रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 01:25 AM2019-12-27T01:25:09+5:302019-12-27T01:25:25+5:30

पर्यटकांचा प्रवास खडतर : समुद्रकिनारी मार्गाकडे लोकप्रतिनिधी, बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

Pits on the dimly lit road in dive aagar | दिवेआगर-भरडखोल रस्त्यावर खड्डे

दिवेआगर-भरडखोल रस्त्यावर खड्डे

Next

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असणारा दिवेआगर-भरडखोल मार्ग पूर्णत: खड्डेमय बनला आहे. या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडल्याने पर्यटक संताप व्यक्त करत आहेत.

श्रीवर्धन म्हटले की, विस्तीर्ण समुद्रकिनारा डोळ्यासमोर येतो. समुद्रकिनाºयालगत असणारे दिवेआगर-शेखाडी या मार्गावरील १७ किलोमीटरचा प्रवास पर्यटकांना सुखद आनंद देणारा ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गावरील दिवेआगर ते भरडखोल या अंतरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ‘नको असले पर्यटन’ असे म्हणत पर्यटक संताप व्यक्त करतात. या सात किलोमीटरच्या अंतरावर पावलोपावली खड्डे दिसतात. कोकणातील पर्यटन तालुका म्हणून श्रीवर्धन तालुक्याची ओळख आहे. राज्यभरातून अनेक भाविक व पर्यटक हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, जंजिरा किल्ल्यावर तसेच या मार्गावर असणाºया भरडखोल व जीवना येथील प्रसिद्ध मासेमारी बंदर येथे नेहमीच ये-जा करतात.
बोर्लीपंचतन या मुख्य शहरातून श्रीवर्धन तालुक्यात शेखाडी या मार्गाने पोहोचता येते. श्रीवर्धन येथे जाण्यासाठी हा पर्यायी मार्ग असून, प्रस्तावित महामार्ग आहे. या मार्गावर एसटीच्या पाच ते सहा गाड्या रोज धावतात. दिवेआगर, भरडखोल, शेखाडी, कोंडवील व आरावी बीच या रस्त्यालगत आहे. त्यामुळे या रस्त्याला वाहनांची वर्दळ नेहमीच असते. मात्र, या मार्गाकडे वेळोवेळी दुर्लक्ष होत आले आहे. या मार्गावर दिवेआगर गावापासून छोटे-मोठे खड्डे पडल्याने रस्तेच खड्ड्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले असून, या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांना कित्येक वर्षे या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती वा डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी तसेच येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

दिवेआगर-भरडखोल रस्त्याची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात यावे, असे मागणी पत्र भरडखोल ग्रामपंचायततर्फे लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे. मात्र, अद्याप दुरुस्ती झाली नाही.
- दिनेश चोगले, सरपंच, भरडखोल.
दिवेआगर-भरडखोल रस्त्याचे डांबरीकरण कामाला मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता नव्याने डांबरीकरण होणार असून, या आठवड्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
- श्रीकांत गनगणे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीवर्धन.

Web Title: Pits on the dimly lit road in dive aagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.