अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे व निमशहरी गावांमध्ये जागतिक बँक अर्थसाहाय्यित ‘जलस्वराज्य-२’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहेत. पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाईग्रस्त गाव मुरावाडी येथे जागतिक बँकेच्या १३ लाख १९ हजार रुपयांच्या अर्थसाहाय्याने पाऊसपाणी संकलन योजना करण्यात येत असून, या गावात जागतिक बँकेच्या प्रतिनिधी स्वाती डोग्रा यांनी भेट देऊन, योजना अंमलबजावणीपूर्व पाहणी केली. स्वाती डोग्रा यांनी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची पहिली झळ ज्या महिलांना पोहोचते, अशा गावांतील महिलांबरोबर सखोल चर्चा केली. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंके, पोलादपूर पं. स. गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, अभियंते बी. एस. तोरो, भू-वैज्ञानिक आर. के. इंगळे, राज्य समाज व्यवस्थापन तज्ज्ञ एस. एस. भालेराव, समाज व्यवस्थापन तज्ज्ञ वसंत राठोड, जिल्हा परिषदेचे रविकिरण जोशी आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
जागतिक बँकेच्या साहाय्याने योजना
By admin | Published: December 26, 2016 4:47 AM