- जयंत धुळपअलिबाग : समाजातील निराधार, अपंग, वयोवृद्ध गरिबांना जगण्यासाठी कुणासमोर हात पसरण्याची आवश्यकता भासू नये, तसेच त्यांचे आयुष्य हे स्वावलंबी असावे, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक अर्थसाहाय्य योजना रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात गरजूपर्यंत पोहोचवण्यात चांगले यश संपादन केले आहे. सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचा लाभ जिल्ह्यातील २७ हजार ७१७ गरजूंना देण्यात आला आहे, तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन विमा योजना, अटल पेन्शन योजना या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार ६६० गरजूंना सामाजिक विमा व पेन्शन योजनेत सामावून घेण्यात आले आहे.राज्य आणि केंद्र शासनाच्या विशेष साहाय्य कार्यक्रमांतर्गत या योजना राबविण्यात येतात. त्यात मुख्यत: इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या सहा प्रमुख योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ निराधार, विधवा, अपंग, वृद्ध अशा समाजघटकांना देण्यात आला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना या योजनांमधून समाजातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रात काम करणाºया गरजूंना विमा संरक्षणाचा लाभ व पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो.या योजनांव्यतिरिक्त १० आॅक्टोबरअखेर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत २ लाख ९१ हजार ७२ लोकांनी शून्य रकमेवर खाती उघडून बँक व्यवस्थेशी स्वत:ला जोडले आहे. दर महिन्याला या योजनांत पात्र लाभार्थी सहभागी होत असतात. जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. योजनेमधून प्राप्त होणारी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने लाभार्थ्यांना सोयीस्कर आहे.केंद्रीय विमा व पेन्शन योजना लाभार्थीक्र. केंद्रीय विमा व पेन्शन योजना जिल्ह्यातील लाभार्थी संख्या१. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ३ लाख ४ हजार २५४२. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना १ लाख ३ हजार ७८३. अटल पेन्शन योजना १० हजार ३२८एकूण ४ लाख १७ हजार ६६०जिल्ह्यातील सप्टेंबरअखेरच्या राज्य योजना लाभार्थी व वित्त वितरणक्र. निवृत्तीवेतन योजना लाभार्थी संख्या लाभार्थींना अदा रक्कम (रु)१. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ ८ हजार ७११ १ कोटी १२ लाख ३२ हजार ८००२. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा १ हजार १५७ १४ लाख ६३ हजार ४००३. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग २०१ २ लाख ८० हजार २००४. राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य ८६ १७ लाख २० हजार५. संजय गांधी निराधार योजना १२ हजार २९८ ५ कोटी १२ लाख १३ हजार ९५०६. श्रावणबाळ सेवा राज्य योजना ५ हजार २६४ ४ कोटी २२ लक्ष ९८ हजार ६००
निराधारांना बळ देणारी योजना झाली यशस्वी; जिल्ह्यात राज्य योजनेचे २७ हजार ७१७ लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:14 AM