शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

नियोजित वस्तू, सेवा कर त्रासदायक

By admin | Published: January 28, 2017 2:57 AM

नियोजित वस्तू व सेवा कर कायद्यातील विवरण पत्र दाखल करणे, कर प्रदान करणे, नोंदणीची मर्यादा आदी तरतुदी लहान व छोटे व्यापारी व व्यावसायिक

अलिबाग : नियोजित वस्तू व सेवा कर कायद्यातील विवरण पत्र दाखल करणे, कर प्रदान करणे, नोंदणीची मर्यादा आदी तरतुदी लहान व छोटे व्यापारी व व्यावसायिक यांच्यासाठी अतिशय किचकट व त्रासदायक आहेत. तसेच या कायद्यातील नोंदणी घेण्यासाठीची २० लाख रु पये मर्यादा व कोम्पोजीशन योजनेखाली ठेवलेली ५० लाखांची मर्यादा तुटपुंजी आहे, असे प्रतिपादन सनदी लेखापाल संजय राऊत यांनी केले आहे. अलिबाग तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जेएसएम कॉलेज अलिबाग येथील जयंत केळुस्कर सभागृहात बुधवारी ‘नियोजित वस्तू व सेवा कर’ या विषयी आयोजित परिसंवादात राऊत बोलत होते. अलिबागमधील व्यापारी व व्यावसायिकांना या कायद्यातील तरतुदी व प्रक्रियेची माहिती व्हावी या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये जीएसटी कशाला लागणार, नोंदणी कोणाला घ्यावी लागणार, नोंदणी कशी मिळेल, विवरण पत्र कोणती, किती व कशी व कधी दाखल करावयाची, कर कसा भरायचा, सेट आॅफ कसा घ्यायचा व मिळेल आदी विषयांवर यामध्ये माहिती देण्यात आली. या परिसवांदात सनदी लेखापाल संजय राऊत व मनोज दुर्गवळी यांनी या विषयाची माहिती उपस्थितांना सोप्या भाषेत समजावली व त्यांच्या शंकांचे निवारण केले. पाहुण्यांचे स्वागत रायगड जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव भारत जैन यांनी केले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संदीप जोशी यांनी केले. सुहास वैद्य यांनी नेटके आयोजन केले. याप्रसंगी अलिबाग परिसरातील व्यापारी व व्यावसायिक उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)