शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा, झाडे जगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 2:45 AM

विद्यार्थ्यांचा संदेश : गोळा के ल्या ६० किलो बिया

दत्ता म्हात्रे 

पेण : शिक्षण जगतात उन्हाळी सुट्टीच्या सत्रामध्ये विद्यार्थीवर्ग पर्यटनातून झाडांच्या बिया गोळा करून त्या बिया परिसरातील रस्ते, उजाड माळरानात टाकून त्याद्वारे उपजत वृक्षनिर्मिती करण्याचा अनोखा व अभिनव उपक्रम पेणमधील खासगी शाळेचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी गेली चार ते पाच वर्षे सातत्याने राबवित आहेत. यावर्षीही उन्हाळी सुट्टीच्या हंगामात परिसरातील माळरान व वृक्षवनराई भागात निसर्ग पर्यटनातून तब्बल ६० किलो विविध प्रकारच्या झाडांच्या बिया गोळा केल्या आहेत. गोळा केलेल्या बिया पावसाअगोदर ओसाड माळराने व रस्त्याच्या कडेला टाकण्याची लगबग विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे यांची सुरू आहे.

पर्यावरण जनजागृतीसाठी, ‘नेहमीची येतो पावसाळा आणि बियांची परिसरात पेरणी करा’ हा संदेश घेऊन जागोजागीचे गावकरी, शेतकरी, प्रवासी व वृक्षप्रेमी मित्र परिवारांकडे प्रसारित करत आहेत. पर्यावरण संवर्धनाचा हा अभिनव प्रयोग वृक्षनिर्मितीसाठी करणे ही अतिशय मोलाची बाब ठरत असल्याने नागरिकांमध्येही या उपक्रमांबाबत चर्चा केली जात आहे.२0१९ हे वर्ष जागतिक तापमानवाढीचे उच्चांक मोडणारे ठरले आहे. निसर्गाशी समतोल न राखता होणारा विकास हा मानवी संस्कृतीच्या विनाशास कारणीभूत ठरत असल्याच्या अनेक घटना सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहेत. भरमसाठ झालेली जंगलतोड, वाढते औद्योगिकीकरण, अनेक प्रकल्पांसाठी डोंगर फोडून केले जाणारे मातीचे उत्खनन यामुळे झाडांची संख्या कमी होऊन माळराने उजाड होत आहेत. माणूसच पर्यावरणाच्या नाशाला कारणीभूत ठरलेला आहे. अनेक प्रसंगात मानवाच्या जाणाऱ्या बळींची संख्याही या निसर्गाच्या असमतोलामुळे वाढली आहे. या समस्येवर कायमचा प्रभावी उपाय म्हणजे वृक्षलागवड होय. त्यासाठी पर्यावरण संवर्धन संकल्पना हाती घेऊन राष्ट्रीय हरित सेना उन्हाळी सुट्टीच्या हंगामात अनेक वृक्षांच्या बिया गोळा करण्यासाठी विद्यार्थीवर्ग दिवसभर उन्हातानात आपला छंद जोपासून एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या बियांचे वाटप व बियांची परिसरात पेरणी अशा दोन्ही प्रकारे आपले उद्दिष्ट साध्य करताना दिसत आहे.या विद्यार्थ्यांनी रेनट्री, करंज, चिंच, काजू, शमी, हादगा, बदाम, जांभूळ, आंबा, बेल व इतर अनेक प्रकारच्या झाडांचे बी गोळा करून आपला परिसर वृक्ष वनराईने समृद्ध व्हावा म्हणून मान्सूनपूर्व बी पेरणीसाठी विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.माळरानावर पेरणीच्विद्यार्थी ही जैवविविधता जोपासण्यासाठी झाडांच्या शेंगा, बी, परिपक्व झालेली फळे यांच्या माध्यमातून मिळालेल्या बी प्रत्यक्ष हातात घेऊन जागोजागी माळरानावर रस्त्याच्या कडेला टाकताना दिसत आहेत.च्याशिवाय हे बी निसर्गप्रेमी, वृक्षमित्र, शेतकरी, नागरिक यांनासुद्धा मोफत पेरण्यासाठी देण्यात येत आहे. राष्ट्रीय हरित सेनेतील या विद्यार्थी वर्गाला ऋतुमानाच्या कालगणनेनुसार कोणत्या झाडाला कोणत्या ऋतूत कोणती फळे येतात, याचे ज्ञान प्रा. उदय मानकवळे यांनी पर्यावरण शिक्षणातून दिलेले आहे.

टॅग्स :Raigadरायगडenvironmentवातावरण