पांढऱ्या कांद्याची एक हजार हेक्टर क्षेत्रात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:56 PM2018-11-25T22:56:19+5:302018-11-25T22:56:24+5:30

अलिबाग-पेण तालुक्यांतील कांद्याला मागणी : दिवाळीनंतर पडणाºया दवावर होते पिकाची वाढ

Planting of white onions in one thousand hectare area | पांढऱ्या कांद्याची एक हजार हेक्टर क्षेत्रात लागवड

पांढऱ्या कांद्याची एक हजार हेक्टर क्षेत्रात लागवड

googlenewsNext

- जयंत धुळप


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि पेण या दोन तालुक्यांत उत्पादन होणाºया पांढºया कांद्याची यंदा एक हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड होत आहे. पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणारा हा कांदा साधारण १२० दिवसांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पडणाºया दवावर त्याची वाढ होते.


पांढºया कांद्याची सर्वाधिक लागवड अलिबाग तालुक्यात होते. भात कापणीची कामे पूर्ण झाल्यावर शेतकरी शेतात पारंपरिक वाफे पद्धतीने पांढºया कांद्याची लागवड करतात. या कांद्याचे बी शेतकरी घरीच तयार करतात.


दरवर्षी पांढरा कांदा तयार झाल्यावर त्यापैकी ५ ते १० टक्के कांदा हा बियाणाकरिता राखून ठेवला जातो. अनेक पिढ्यांपासूनची बियाणांची ही पद्धत असल्याने अलिबागमधील पांढºया कांद्याची गोडी वाढवत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.


अलिबाग तालुक्यातील शेतजमिनीत असलेल्या विशिष्ट क्षारांमुळे या कांद्याची चव वेगळी जाणवते. पांढºया कांद्याच्या माळा नेहमीच ग्राहकांना आकर्षित करतात. अलिबागमधील कांद्याचे बियाणे अन्यत्र लागवड करून पांढºया कांद्याचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, अलिबाग-पेणमधील पांढरा कांदा व अन्यत्रचा पांढरा कांदा यामध्ये मोठी तफावत असल्याचे जगदीश म्हात्रे यांनी सांगितले.
अलिबाग-पेण या दोन तालुक्यांतील पांढºया कांद्याच्या उत्पादकता वृद्धीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होत असले तरी ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. या कांद्याचे बियाणे निर्मिती करीत विशेष संशोधनाची गरज आहे.


अलिबाग-पेण तालुक्यांतील पांढºया कांद्याची निर्मिती करणाºया मातीचा अभ्यास करून, या दोन तालुक्यांबरोबरच रायगड जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतील कांद्याच्या उत्पादनाकरिता आवश्यक संशोधन करून ते शेतकºयांना देणे गरजेचे आहे. पावसाळ््यात भात पीक झाल्यावर पुढील १२० दिवसांत पांढºया कांद्याचे हे नगदी पीक शेतकºयांना घेता येते. मात्र, याबाबत योग्य नियोजन झाल्यास शेतकºयांमध्ये आर्थिक सुबत्ता येऊ शकेल असा विश्वास श्रमिक मुक्ती दल या शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी व्यक्त केला आहे.

बनावट कांद्याची विक्री
अलिबाग-पेण तालुक्यांतील पांढरा कांदा सर्वत्र प्रसिद्ध असून त्याचे औषधी गुणधर्म सर्वांना माहीत आहेत. याच मुद्द्याचा व्यावसायिक उपयोग करून या दोन तालुक्यांतील पांढरा कांदा विक्रीकरिता उपलब्ध झाला नाही वा तो संपल्यावर राज्याच्या अन्य भागात होणारा, परंतु चवीला तिखट असणारा पांढरा कांदा आणून तो अलिबाग-पेणचा पांढरा कांदा म्हणून गोवा राष्ट्रीय महामार्गावर विकला जातो. त्यातून ग्राहकांची फसवणूक आणि अलिबाग-पेणच्या अस्सल पांढºया कांद्याची बदनामी होत असल्याची तक्रार डोंबिवलीतील सुधाकर पेंडसे या ग्राहकाने केली आहे.

Web Title: Planting of white onions in one thousand hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.