शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
4
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
5
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
7
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
8
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
9
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
10
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
11
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
12
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
13
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
14
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
15
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
16
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
17
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
18
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
19
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
20
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

पांढऱ्या कांद्याची एक हजार हेक्टर क्षेत्रात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:56 PM

अलिबाग-पेण तालुक्यांतील कांद्याला मागणी : दिवाळीनंतर पडणाºया दवावर होते पिकाची वाढ

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि पेण या दोन तालुक्यांत उत्पादन होणाºया पांढºया कांद्याची यंदा एक हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड होत आहे. पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणारा हा कांदा साधारण १२० दिवसांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पडणाºया दवावर त्याची वाढ होते.

पांढºया कांद्याची सर्वाधिक लागवड अलिबाग तालुक्यात होते. भात कापणीची कामे पूर्ण झाल्यावर शेतकरी शेतात पारंपरिक वाफे पद्धतीने पांढºया कांद्याची लागवड करतात. या कांद्याचे बी शेतकरी घरीच तयार करतात.

दरवर्षी पांढरा कांदा तयार झाल्यावर त्यापैकी ५ ते १० टक्के कांदा हा बियाणाकरिता राखून ठेवला जातो. अनेक पिढ्यांपासूनची बियाणांची ही पद्धत असल्याने अलिबागमधील पांढºया कांद्याची गोडी वाढवत असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.

अलिबाग तालुक्यातील शेतजमिनीत असलेल्या विशिष्ट क्षारांमुळे या कांद्याची चव वेगळी जाणवते. पांढºया कांद्याच्या माळा नेहमीच ग्राहकांना आकर्षित करतात. अलिबागमधील कांद्याचे बियाणे अन्यत्र लागवड करून पांढºया कांद्याचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, अलिबाग-पेणमधील पांढरा कांदा व अन्यत्रचा पांढरा कांदा यामध्ये मोठी तफावत असल्याचे जगदीश म्हात्रे यांनी सांगितले.अलिबाग-पेण या दोन तालुक्यांतील पांढºया कांद्याच्या उत्पादकता वृद्धीसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न होत असले तरी ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. या कांद्याचे बियाणे निर्मिती करीत विशेष संशोधनाची गरज आहे.

अलिबाग-पेण तालुक्यांतील पांढºया कांद्याची निर्मिती करणाºया मातीचा अभ्यास करून, या दोन तालुक्यांबरोबरच रायगड जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतील कांद्याच्या उत्पादनाकरिता आवश्यक संशोधन करून ते शेतकºयांना देणे गरजेचे आहे. पावसाळ््यात भात पीक झाल्यावर पुढील १२० दिवसांत पांढºया कांद्याचे हे नगदी पीक शेतकºयांना घेता येते. मात्र, याबाबत योग्य नियोजन झाल्यास शेतकºयांमध्ये आर्थिक सुबत्ता येऊ शकेल असा विश्वास श्रमिक मुक्ती दल या शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी व्यक्त केला आहे.बनावट कांद्याची विक्रीअलिबाग-पेण तालुक्यांतील पांढरा कांदा सर्वत्र प्रसिद्ध असून त्याचे औषधी गुणधर्म सर्वांना माहीत आहेत. याच मुद्द्याचा व्यावसायिक उपयोग करून या दोन तालुक्यांतील पांढरा कांदा विक्रीकरिता उपलब्ध झाला नाही वा तो संपल्यावर राज्याच्या अन्य भागात होणारा, परंतु चवीला तिखट असणारा पांढरा कांदा आणून तो अलिबाग-पेणचा पांढरा कांदा म्हणून गोवा राष्ट्रीय महामार्गावर विकला जातो. त्यातून ग्राहकांची फसवणूक आणि अलिबाग-पेणच्या अस्सल पांढºया कांद्याची बदनामी होत असल्याची तक्रार डोंबिवलीतील सुधाकर पेंडसे या ग्राहकाने केली आहे.