प्लास्टिक बॉटल रिसायकलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:23 AM2018-01-17T01:23:42+5:302018-01-17T01:23:42+5:30
पनवेल महापालिकेत आरोग्य विभागामार्फत मंगळवारी सकाळी प्लास्टिक बाटल्यांचे क्र शर मशिन बसवण्यात आले. या वेळी मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर
पनवेल : पनवेल महापालिकेत आरोग्य विभागामार्फत मंगळवारी सकाळी प्लास्टिक बाटल्यांचे क्रशर मशिन बसवण्यात आले. या वेळी मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेत येणाºया नागरिकांनी सोसायटीमध्ये मशिन बसवून प्लास्टिकची विल्हेवाट लावावी, असे या वेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिका नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ही मशिन ठेवण्यात आली आहे. ही प्रातिनिधिक कचराकुंडी असून, ओल्या कचºयाच्या विघटनासाठी या स्वरूपाची कचराकुंडी बनवावी, असा संदेश देण्यात येत आहे.
इलेक्ट्रिक मशिनची क्षमता दिवसाला ५०० बॉटल अशी आहे. यामध्ये तयार होणारे प्लास्टिक १८ रु पये किलो दराने विकले जाणार आहे. मशिनची किंमत अडीच लाख रुपये आहे. पनवेल महापालिकेने पालिका क्षेत्रात संपूर्ण प्लास्टिक पिशव्या बंदीचा निर्णय घेतला आहे. कचरा वर्गीकरणासाठी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबवत आहे.