शिघ्रे गावात प्लास्टिकचा खच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 11:25 PM2019-12-07T23:25:04+5:302019-12-07T23:25:32+5:30
मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत असणाऱ्या गटरात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे.
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत असणाऱ्या गटरात प्लास्टिक पिशव्यांचा खच पडला आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असले तरी ग्रामीण भागात त्याचा वापर होताना दिसतो. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पशूपक्ष्यांनाही बाधा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भाग प्लास्टिक पिशव्यामुक्त कधी होणार, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
राज्यात प्लास्टिक पिशव्या, सिंगल युज प्लास्टिक वापरण्यास बंदी असली तरी ग्रामीण भागात त्यांचा वापर सर्रास होताना दिसतो. ५० मायकॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असली, तरी ही बंदी झुगारून दुकानादाराकडून पिशव्या दिल्या जात आहेत. ग्राहकही त्या घेत असून वापरून झाल्यावर कचºयात टाकत आहेत. शिघ्रे ग्रामपंचायत सरपंचांनी दुर्लक्ष न करता, पिशवीचा वापर करणाºयावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.