- विनोद भोईर
पाली : वनराई बंधारा बांधताना सिमेंटच्या गोणीमध्ये माती भरली जाते. कोकणातील ओढ्यांमधे किंवा आजूबाजूला माती कमी असते ती माती गोणींमध्ये भरून दरवर्षी वाहून जाते. त्यामुळे मृदेचा ºहास होतो. हे मोठे नुकसान टाळण्यासाठी, मृदा संधारण व बंधारा लवकर, कमी पैशांत व सोप्या रीतीने बांधण्यासाठी मातीच्या ऐवजी प्लॅस्टिक कापडाचा (गादी) वापर करण्याचे तंत्र जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी विकसित केले आहे.
नुकतेच सिद्धेश्वर येथे प्रायोगिक तत्त्वावर अशा स्वरूपाचा बंधारा बांधण्यात आला होता. जिल्ह्णातील हा बहुधा पहिला प्रयोग आहे. सिद्धेश्वर गावचे सरपंच उमेश यादव यांना जलतज्ज्ञ डॉ. गोखले यांनी गावात अशा स्वरूपाचा पहिला प्रयोग करण्यास सांगितले. त्यानुसार गोखले यांनी तयार केलेल्या प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या किंवा गादीसारखे कापड देण्यात आले. काही दिवसांपूर्वी सिद्धेश्वर गावात ज. नौ. पालीवाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे शिबिर भरले होते. या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मिळून प्लॅस्टिक कापडाच्या पिशवीद्वारे (गादी) बंधारा बांधून हा प्रयोग यशस्वी करून दाखविला. तसेच ग्रामस्थांनीही सहकार्य केले. मात्र, काही दिवसांनी कापडाला छिद्र पडले; पण बंधारा सुस्थितीत होता. काही लोकांनी बंधाऱ्याचे हे प्लॅस्टिक लंपास केले. तरीसुद्ध हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यात काही सुधारणा करून पुन्हा या पद्धतीने इतरत्र मृदा संवर्धनाचे बंधारे बांधले जाऊ शकतात, असे जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले यांनी सांगितले.
काम कसे करावे?च्ज्या ओढ्यामध्ये बंधारा बांधायचा असेल, तेथे तळाचा भाग साधारण सपाट करतात. ओढ्यातील गाळ वा रेवसा हलवून जलाभेद्य स्तरापर्यंत जावे. उघडा कातळ असेल तर त्याची गरज पडत नाही. साधारण समतल करून घेणे. थोडी असमतोल जागा असेल तरीसुद्धा बंधाºयाच्या वरील भाग सम ठेवणे. त्यानंतर ही प्लॅस्टिकची गादी तेथे बसवून घेणे. गादी पूर्णपणे पाण्याने भरून घेणे, यामुळे गादीचे वजन वाढते आणि एक छोटा बंधारा पटकन तयार होतो. गरज पडल्यास थोडे दगड किंवा गोणी वापरून बांधाला आधार द्यावा.
उपयोग व महत्त्वमाती वाचते, मृदा संधारण होते. कमी वेळात बंधारा पूर्ण होतो. बांधाºयातील पाणी आटले तरी बांधामध्ये पाणी असेल तेही बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वापरता येईल.
कोकणातील ओढ्यांमध्ये किंवा आजूबाजूला तशीही माती कमी असते. बंधारा बांधण्यासाठी ती माती गोणींमध्ये भरली जाते. मात्र, दरवर्षी ही माती वाहून जाते व मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी वनराई बंधारे बांधताना मातीच्या ऐवजी काय वापरता येईल आणि बंधारा सोपा कसा होईल त्याचा विचार करत होतो, त्या वेळी असे लक्षात आले की, आपण जाड प्लॅस्टिकची एक मोठी गादी तयार केली आणि पाण्याने भरली तर तीसुद्धा हे काम करू शकेल. म्हणून प्रयोगादाखल एक प्लॅस्टिकची एक हवाबंद गादी तयार करून घेतली. त्या गादीत पाणी भरण्यासाठी पाइप ठेवले. ती वापरून सिद्धेश्वर येथे तो बंधारा प्रायोगिक तत्त्वावर घालण्यात आला. यात कष्ट कमी आहेत आणि माती वाहून जाण्याचा धोका नाही.- डॉ. अजित गोखले, जलतज्ज्ञ, डोंबिवली