शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

प्लॅस्टिकबंदी सक्तीच्या विरोधात बंद सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:03 AM

वावोशी : राज्य शासनाने ५0 मायक्र ॉन खालील सर्व प्रकारचे प्लॅस्टिकबंदी तसेच प्रदूषणकारी थर्माकोल बंदीबाबतचा निर्णय घेऊन तो सक्तीने अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. सामान्य नागरिक व पर्यावरणप्र्रेमी यांच्याकडून या निर्णयाचे एका बाजूला स्वागत केले जात असले तरी पर्यायी उपाय नाही व पाच हजारांच्या दंडात्मक कारवाईबाबत व्यापारी वर्गात कमालीची नाराजी आहे.गुरु ...

वावोशी : राज्य शासनाने ५0 मायक्र ॉन खालील सर्व प्रकारचे प्लॅस्टिकबंदी तसेच प्रदूषणकारी थर्माकोल बंदीबाबतचा निर्णय घेऊन तो सक्तीने अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. सामान्य नागरिक व पर्यावरणप्र्रेमी यांच्याकडून या निर्णयाचे एका बाजूला स्वागत केले जात असले तरी पर्यायी उपाय नाही व पाच हजारांच्या दंडात्मक कारवाईबाबत व्यापारी वर्गात कमालीची नाराजी आहे.

गुरु वारी राज्य शासनाचे रायगड प्लॅस्टिक विरोधी पथक खोपोलीत दाखल होऊन तपासणी व कारवाईला सुरु वात होताच येथील व्यापारी वर्गाने आक्र मक भूमिका घेत गुरु वारी बाजार व दुकाने बंद केली. ती शुक्र वारीही बंद ठेवून राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी एक वाजता खालापूर येथे तहसीलदार यांची भेट घेऊन व्यापारी वर्गाकडून निषेधार्थ निवेदन देण्यात आले .खोपोली व खालापुरातील व्यापारी वर्गाचा प्लॅस्टिकबंदीबाबत कमालीचा विरोध असून, पाच हजार रुपये दंड हा फार मोठा भुर्दंड असल्याने संताप व्यक्त होत आहे. गुरुवारी प्रदूषण मंडळाचे प्लॅस्टिक विरोधी पथक दुपारी अचानक खोपोलीत दाखल झाले. या पथकाने दुकानांची तपासणी करण्यासाठी आग्रह धरला, तेव्हा व्यापारी वर्गाने तीव्र विरोध केला. दुसरीकडे पथक तपासणीसाठी आग्रही असल्याचे लक्षात येताच सर्व व्यापारी वर्गाने व गुरुवार बाजारमधील दुकानदारांनी तत्काळ आपली दुकाने व गुरुवार बाजार बंद केला. परंतु पथकातील अधिकारी वर्गाने आम्हाला शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कडक आदेश असल्याचे सांगून, तपासणी व दंडात्मक कारवाई होईलच असा आग्रह धरल्याने काही काळ तणाव वाढला. मात्र अधिकारी कारवाई व तपासणीबाबत ठाम राहिल्याने शुक्रवारीही खोपोलीतील दुकाने बंद ठेवण्यात आली .

शुक्रवारीही संपूर्ण बाजार बंद ठेवून, व्यापारी वर्गाकडून दुपारी या बाबतीत खालापूर तहसीलदार यांच्याकडे प्लॅस्टिकबंदीनंतर व्यापारी वर्गाला येत असलेल्या अडचणी व प्लॅस्टिकबंदी पथकाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात संघटितपणाने निषेधार्थ निवेदन देण्यात आले. या निवेदनात कारवाई स्थगित करा, आधी पर्यायी उपाय सुचवा व मगच प्लॅस्टिकबंदी सक्ती आणि दंडात्मक कारवाई करा असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात आले. तसेच याबाबत योग्य निर्णय न झाल्यास खोपोली व खालापूर तालुक्यातील व्यापारी अनिश्चित काळासाठी आपली दुकाने बंद ठेवतील असे लेखी निवेदन देऊन सांगण्यात आले. तर प्लॅस्टिकबंदी नियंत्रण पथक व खालापूर तहसीलदार यांनी हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय असून, यावर मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने सदर निर्णय अमलात आणावाच लागेल अशी भूमिका घेत व्यापारी वर्गाला याबाबत समजून सांगितले. तरीही व्यापारी वर्गाच्या अडचणी व भावना वरिष्ठ पातळीवर पाठविल्या जातील, असेही आश्वासन खालापूरचे तहसीलदार चपल्लवार यांनी दिले.दरम्यान, पाच हजारांची दंडात्मक कारवाई रोखण्यासाठी व प्लॅस्टिकला पर्यायी उपाय शासन देत नाहीतोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर येथील व्यापारी शेवटपर्यंत ठाम आहेत . 

टॅग्स :RaigadरायगडPlastic banप्लॅस्टिक बंदी