'खेळाडूंनी दडपण न घेता दर्जेदार खेळ खेळावा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:46 PM2018-11-02T22:46:40+5:302018-11-02T22:47:06+5:30
नंदिनी बोंगाडे यांचे मार्गदर्शन; राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा सुरू
अलिबाग : प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तशी क्र ीडा क्षेत्रातही आहे. खेळाडूंनी स्पर्धेचे दडपण न घेता त्यांचा मूळ खेळ खेळून दर्जेदार कौशल्याचे प्रदर्शन सातत्यपूर्ण प्रयत्न व कठोर परिश्रम घेऊन करावे, असे मार्गदर्शन हॅण्डबॉल खेळातील शिवछत्रपती क्र ीडा पुरस्कार प्राप्त आणि जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या डॉ. नंदिनी बोंगाडे यांनी गुरुवारी येथे केले.
क्र ीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्र ीडा परिषदेच्या वतीने जिल्हा क्र ीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन बोंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संघटक सूर्यकांत ठाकूर, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे महासचिव सुरेश बोंगाडे, जिल्हा क्र ीडा अधिकारी महादेव कसगावडे, सौगत दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होणार
बोंगाडे म्हणाल्या, या स्पर्धेमधून राज्याचा संघ निवडण्यात येणार असून चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होणार आहेत. त्यामुळे खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी.
स्पर्धेत अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे व कोल्हापूर अशा एकूण आठ विभागातून ५०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. प्रारंभी डॉ. नंदिनी बोंगाडे यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला.
सूर्यकांत ठाकूर यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्याची गतवर्षाची राष्ट्रीय पदकविजेती श्रावणी जाधव हिने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्र माचे प्रास्ताविक जिल्हा क्र ीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले.