कर्जत : रेल्वेस्थानकातील फलाट क्र मांक दोनवरील पादचारी पुलाच्या मुंबई एंडकडील उतरणाऱ्या पायऱ्या तयार होऊन अनेक महिने झाले; परंतु तो सुरू करण्यास जुन्या स्वच्छतागृहाचा अडसर होता. नवीन स्वच्छतागृह बांधून ते प्रवाशासाठी खुले करण्यात आल्याने जुने स्वच्छतागृह तोडायला सुरुवात केली आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
फलाट क्रमांक दोन व तीनच्या मध्ये काही वर्षांपूर्वी नवीन पूल उभारण्यात आला आहे. त्या वेळी त्याच्या पायºया पुण्याच्या दिशेकडे उतरण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले होते. प्रशासनाने याबाबत तांत्रिक अडचणी पुढे करून मुंबईच्या दिशेकडे पुलाच्या पायºया उतरविण्याबाबतची माहिती दिली होती. त्यामध्ये कधी निधी उपलब्ध नाही तर कधी ठेकेदार काम करीत नाही, अशी कारणे दिली होती. त्यामुळे पाच-सहा वर्षांनंतर मुंबईच्या दिशेला उतरणाºया पायºया तयार केल्या. मात्र, पायºया संपतात तेथे जुन्या स्वच्छतागृह असल्याने पायºया तयार होऊनही त्याचा उपयोग होत नव्हता. अखेर रेल्वे प्रशासनाने फलाट दोन व तीनच्या मध्ये पुण्याच्या दिशेला नवीन स्वच्छतागृह तयार केले.च्यापूर्वीचे जुने स्वच्छतागृह महिला व पुरु षांसाठी वेगवेगळे होते. मात्र, हे स्वच्छतागृह महिला व पुरुषांसाठी एकाच इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहे. ते मागील आठवड्यात प्रवाशांसाठी खुले केले आणि जुने स्वच्छतागृह तोडण्याची सुरु वात केली. हे स्वच्छतागृह तोडून पादचारी पूल कधी सुरू करण्यात येईल, अशी विचारणा ओसवाल यांनी केली असता ३० एप्रिलपर्यंत स्वच्छतागृह तोडण्याचे काम पूर्ण होईल असे रेल्वे प्रशासनाने त्यांना कळविले आहे. एकंदरीत मे महिन्याच्या सुरु वातीला मुंबई दिशेच्या पायºया प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.