पालघर पालिकेकडून नागरिकांची लूट
By Admin | Published: December 30, 2016 04:14 AM2016-12-30T04:14:15+5:302016-12-30T04:14:15+5:30
या नगरपरिषदेने पालघरवासीयांकडून पाणीपट्टीची नावावर अव्वाच्यासव्वा वसूली करून त्यांची लूटच चालवली आहे. नळधारकांना प्रत्यक्ष पाण्याच्या वापरा पेक्षा
पालघर : या नगरपरिषदेने पालघरवासीयांकडून पाणीपट्टीची नावावर अव्वाच्यासव्वा वसूली करून त्यांची लूटच चालवली आहे. नळधारकांना प्रत्यक्ष पाण्याच्या वापरा पेक्षा जादा रक्कमेची सरासरी बिले बजावून त्यांची वसूली होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पालघर शहरात ग्रामपंचायत काळा पासूनच पाइपलाइन गटारा लगतच टाकण्यात आली असून बहुतांशी दूषित पाण्याचा पुरवठा होत असतो. तर शहरातील अनेक नळजोडण्या या बेकायदेशीरपणे सुरु असल्याने अधिकृत नळजोडणीधारकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नगरपरिषदेच्या बैठकीत होत आहेत.
पालघर टेंभोडे रस्त्यावरील हार्मनि रेसिडेंन्शिल समोर राहणाऱ्या शशिकला हरेश्वर दारुवाले यांना नोव्हेंबर महिन्याचे पाणीपट्टीचे १६० युनिट १८६० रुपयांचे बिल पाठविण्यात आले.
मात्र अभय दारुवाले यांनी आपले बिल आणि मीटर मधील रिडींग यांची तपासणी केली असता ४५ युनिट जास्त लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष नळजोडणी धारकाकडे न जाता सरासरी बिले माथी मारली जात असल्याचे दारुवाले यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे ह्यांच्याशी संपर्क साधला असता चुकीची बिले आली असल्यास ती दुरु स्त केली जातील असे सांगितले.