रेल्वेची पार्र्किं गच्या नावे लूट
By admin | Published: August 12, 2015 12:21 AM2015-08-12T00:21:19+5:302015-08-12T00:21:19+5:30
सुविधाशून्य, सुरक्षिततेचा अभाव असतानाही नवीन पनवेलकडे असलेल्या पार्किंगमध्ये जास्त दर आकारला जात आहे, तर बाजूलाच असलेल्या सिडकोच्या पार्किंगचे दर कमी आहेत.
पनवेल : सुविधाशून्य, सुरक्षिततेचा अभाव असतानाही नवीन पनवेलकडे असलेल्या पार्किंगमध्ये जास्त दर आकारला जात आहे, तर बाजूलाच असलेल्या सिडकोच्या पार्किंगचे दर कमी आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी असून या संदर्भात स्थानिक प्रशासनाच्या हातात काहीच नसल्याचे परिस्थिती जैसे थे आहे.
पनवेल रेल्वेस्थानक अ दर्जाचे स्थानक असून लवकरच या ठिकाणी जंक्शन होणार आहे. याच स्थानकात दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत असल्याने दररोज हजारो प्रवाशांची स्थानकात वर्दळ असते.
नवीन पनवेलच्या बाजूने येणारा प्रवासीवर्ग मोठा असल्याने त्याबाजूला रेल्वेने १३00 चौरस मीटर जागेवर पार्किंग सुरू केले आहे. २ ते ६ तास या कालावधीकरिता दुचाकी वाहनांकरिता पाच रूपये भाडे ठेवण्यात आले आहे. त्यापुढे सहा तासांपेक्षा जास्त हा दर १५ रूपये आहे. मुंबई किंवा इतर ठिकाणी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना किमान दहा तास तरी गाडी पार्किंगकरिता लावावी लागते. त्यामुळे रेल्वे तिकिटाइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त खर्च पार्किंगवर होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
पार्किंगचे धोरण हे वरिष्ठ कार्यालयाकडून ठरते. त्याकरिता आम्हाला कोणताही अधिकार नाहीत. रेल्वेच्या पार्किंगमधील दर सिडकोपेक्षा जास्त आहे. याशिवाय येथे सुविधा नाही ही वस्तुस्थिती आहे.
-दिनेश गुप्ता, स्थानक प्रबंधक, पनवेल