पोलादपूर बस अपघात: प्रकाश सावंत - देसाई संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 09:56 PM2018-08-04T21:56:15+5:302018-08-04T21:56:56+5:30

सामाजिक कार्यकर्ता संजय गुरव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली पत्राद्वारे चौकशीची मागणी 

Poladpur Bus Accident: Prakash Sawant - Desai is likely to be found in doubt | पोलादपूर बस अपघात: प्रकाश सावंत - देसाई संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता 

पोलादपूर बस अपघात: प्रकाश सावंत - देसाई संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता 

मुंबई - पोलादपूर येथील आंबेनळी घाटातील भीषण बस अपघातामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ३३ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. कारण, अपघातातून एकमेव बचावलेले प्रकाश सावंत-देसाई हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या अपघाताची तसेच प्रकाश सावंत -देसाई यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी केली आहे. हे गुरव यांनी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

आंबेनळी घाटातील भीषण बस अपघातामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील ३३ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नेमके कोण गाडी चालवत होत, यावरुनही सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या बस अपघात प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गुरव यांनी पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Poladpur Bus Accident: Prakash Sawant - Desai is likely to be found in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.