पोलादपूर- फोपळयाचा मुरा येथे वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 03:13 PM2018-03-15T15:13:22+5:302018-03-15T15:13:22+5:30

Poladpur - Four people were killed and 16 injured in Varaha's car collapse in Popalai Murra | पोलादपूर- फोपळयाचा मुरा येथे वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

पोलादपूर- फोपळयाचा मुरा येथे वऱ्हाडाची गाडी दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

googlenewsNext

पोलादपूर- साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी फोपल्याचा मुरा येथे जात असनाता तीव्र चढावर गाडीचा अपघात झाला आहे. गाडी 30 ते 40 फुट दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यु झाला. 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात ते आठ जणांना उपचारासाठी महाड, माणगाव  येथे पाठविन्यात आले असून काही जखमींना जवळच्या पोलादपुर  ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर घटना बुधवार रात्री सव्वा सातच्या दरम्यान घडली. 
या अपघातात भिकू तुकाराम मालुसरे रा. अडावळे एरंड वाडी, पांडुरंग धोंडू बीरमणे रा. अडावळे, अनिकेत अनंत सकपाळ रा. पार्टेकोंड, हे जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान  जीजाबाई केशव पार्टे रा. पार्टेकोंड यांचा मृत्यू झाला. जखमीमध्ये इंदूबाई रामचंद्र पार्टे, वय 65 वर्षे,वनिता बाळाराम पवार वय 55 वर्षे,अरुणा सोनु सकपाळ , सुनीता सखाराम मांढरे,अशोक लक्ष्मण पार्टे,रेणुका भागुराम सकपाळ, कृष्णा बाई गणपत वाडकर, अंकिता सुरेश पार्टे वय 9 वर्षे, सुरेश लक्ष्मण पार्टे वय 49 वर्षे, चिमा बाई बाळाराम वाडकर वय 60 वर्षे,आकाश पार्टे,अमित सुरेश पार्टे वय 15 वर्षे, राजेश्री तुकाराम सकपाळ वय 45 वर्षे, प्रदीप रामचन्द्र पार्टे (चालक) , गणेश सयाजी पार्टे, ममता बाई भीकाजी  पार्टे, मनिषा अशोक पार्टे, सर्व रा. पार्टेकोंड  यांचा समावेश आहे.
हा अपघात पोलादपुर पासून 22 km अंतरावर झाला.अडावले ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेंद्र बांदल यानी ग्रामस्थांच्या सहाय्याने जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. या अपघाताची माहिती कळताच राजिप माजी उपाध्यक्ष  तथा जिप सदस्य चंद्रकांत कळंबे,तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, माजी सभापती दिलीप भागवत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक अंधेरे व पोलिस कर्मचारी,नगरसेवक, पत्रकार, पार्टेकोंड, पोलादपुर, शहरातील सुजान नागरिक मदतीसाठी धावले, तसेच सरकारी रुग्णालयातील डॉ पाटील मॅडम,डॉ सोनावणे,डॉ सलागरे, डॉ मोराले, तसेच खाजगी दवाखान्यातील डॉ मपारा, डॉ  साळुंके,  यांनी तातडीने जखमी व्यक्तीवर उपचार केले. रुग्णालयासमोर नातेवाईक व ग्रामस्थांचा आक्रोश  पाहून सर्वांचे मन हेलावून जात होते.सर्व वातावरण मन सुन्न करणारे होते.
या अपघाताची नोंद पोलादपुर पोलिस ठाण्यात केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मिन्डे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Poladpur - Four people were killed and 16 injured in Varaha's car collapse in Popalai Murra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.