शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पोलादपूर-कशेडी बोगदा लवकरच; २५ किमीसाठी पर्यायी मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:25 AM

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते ...

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते कशेडीपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर पोलादपूर ते कशेडी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून बोगद्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाकडून देण्यात आली आहे.मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते इंदापूर हे काम रखडलेले असले तरी इंदापूर ते कशेडी हे दुसºया टप्प्याचे काम जोमाने सुरू आहे. हे कामदेखील एल अ‍ॅण्ड टी आणि महिंद्रा कंपनीने घेतले असल्याने काम दर्जेदार होईल, असा स्थानिकांना विश्वास आहे.पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ बोगदा तयार करण्यात येत आहे. साधारण ११ किमीचा हा बोगदा असून, १६ मीटर रुंद आणि ११ मीटर उंचीचा बोगदा २०२०पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर ते कशेडी हे अंतर साधारण १४ किमी असून, हे अंतर घाट मार्गाचे आहे. घाटात असलेल्या वळणांमुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात; शिवाय वेळ आणि इंधनही खर्च होत आहे.घाट रस्त्यात धामनदिवी गावाजवळ रस्ता खचलेला आहे. यासाठी अनेक उपाय करूनही हा रस्ता दरवर्षी खचतोच. यामुळे पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडतो. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असतात. याला पर्याय म्हणून इंदापूर ते कशेडी यादरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात पोलादपूरजवळ भोगाव गावाजवळ एका बोगद्याचे काम केले जाणार आहे. यामुळे अंतर आणि इंधन बचत होणार आहे. घाट रस्त्याचे अंतर सुमारे १४ किमी असले तरी उंच घाट असल्याकारणाने वेळ आणि इंधन खर्च होतो. मात्र हा बोगदा झाल्यास हे अंतर ४ किमीने कमी होऊन बोगद्यातील अंतर जवळपास ११ किमी होणार आहे. यामध्ये तीन पदरी दोन बोगदे असून, एका जाणारा आणि एक येणाºया वाहनांसाठी असणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.२५ किमीसाठी पर्यायी मार्ग- महामार्ग विभागाने बोगद्याच्या कामासाठी ५०२ कोटींची निविदा काढली होती. मात्र रिलायन्स कंपनीने हे काम ४४३ कोटींना घेतले आहे, अशी माहिती महामार्ग विभागाच्या महाड कार्यालयाकडून मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. कोकणात जाणाºया चाकरमान्यांचा प्रवासातील त्रास या मार्गामुळे कमी होणार आहे.- इंदापूर ते कशेडी चौपदरीकरणाबरोबरच रत्नागिरी विभागात कशेडी घाट समाप्तीनंतर होणारे महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पोलादपूर ते कशेडी यादरम्यानचे किमान २५ किमीचे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी बोगदा तयार केला जाणार आहे. मात्र दोन्ही भागांचे काम पूर्ण झाले तरी जोपर्यंत बोगदा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मार्ग पूर्वीप्रमाणेच अपूर्ण राहणार आहे. मात्र रिलायन्स कंपनीने या बोगद्याचे काम घेतल्याने हे काम लवकर पूर्ण होऊन दोन्ही जिल्हे कमी अंतरात जोडले जाणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड