महाड : ५०० मीटर अंतराच्या आत असलेली दारू विक्री व परमीट रूम बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर पोलादपूर व म्हसळा या दोन तालुक्यांत शंभर टक्के दारू विक्री बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अंमलबजावणी झाल्यानंतर या दोन तालुक्यांत शंभर टक्के दारू विक्री बंद झाल्याचे उघड झाले आहे.निर्णयानंतर महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांतील एकूण ८३ दुकाने आणि परमीट रूम पैकी ५० दुकाने बंद झाली असून, केवळ ३३ दुकाने सुरू आहेत. तर या निर्णयाचा सार्वत्रिक फटका पोलादपूर व म्हसळा तालुक्यांतील दारू विक्री परवानाधारकांना बसला आहे. म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांतील २८ दारू दुकाने बंद झाली आहेत.दरम्यान, या निर्णयानंतर महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांत अवैध दारू विक्रीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग व यंत्रणा नसल्याने ही अवैध दारू विक्री रोखण्यासाठी या विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे. या विभागाच्या महाड येथील कार्यालयातून महाडसह पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या चार तालुक्यांचे काम पाहिले जाते. या ठिकाणी एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, एक सहा. निरीक्षक तीन कॉन्स्टेबल व एक लेडीज कॉन्स्टेबल अशी पदे मंजूर आहेत. यापैकी निरीक्षक हे पद रिक्त असून त्याचा कारभार खोपोली येथील निरीक्षक माने यांच्याकडे आहे. (वार्ताहर)केवळ ३३ दुकाने सुरू - दोन्ही तालुक्यांतील अवैध दारू विक्री रोखण्याचे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.- महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांतील एकूण ८३ दुकाने आणि परमीट रूम पैकी ५० दुकाने बंद झाली असून, केवळ ३३ दुकाने सुरू आहेत.
पोलादपूर, म्हसळेत शंभर टक्के दारू विक्री बंद
By admin | Published: April 09, 2017 1:21 AM