पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात दडी मारलेला पाऊस शनिवारी दमदार कोसळला. त्याच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे डोंगरदऱ्यांत शेतामध्ये भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे.यंदा जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने वेळेवर हजेरी लावून भाताचे तरवे लावणीयोग्य झाले असताना मध्यंतरी दडी मारली. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर झाला होता. मात्र, आता विसावलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावून सुरुवात केल्यानंतर, शेतामध्ये सर्वत्र आवश्यक तेवढे पाणी असल्याने भातलावणीच्या कामाने वेग घेतला आहे.दरम्यान, तालुक्यात दमदार पावसामुळे कशेडी परिसरातील धामणदेवी, भोगाव, कोंढवी, महालगुर, पळचिल, खडकणे, गोलदरा, कातळी बंगला, दत्तवाडी, मोरेवाडी, तामसडे, देवळे पंचक्रोशी, ढवली, सावित्री आदी परिसरांसह तालुक्यात कामथे खोरा, तुर्भे खोरा, कोतवाल विभाग आदी ठिकाणी भातलावण्यांच्या कामाने वेग घेतला असून, बैलजोडीच्या साह्याने शेतात चिखल करून भातलावणी सुरू केली आहे.पाऊस असाच बरसत राहिला, तर येत्या आठ दिवसांत भातलावणीची कामे पूर्ण होतील, असे जाणकार शेतकºयांनी सांगितले.वाºयाच्या वेगाने ग्रामस्थ भयभीतरेवदंडा : मागील महिन्याच्या ३ तारखेला निसर्ग चक्रीवादळाने चांगलाच तडाखा दिला असल्याच्या ताज्या आठवणी समोर असताना, शनिवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर काही वेळ सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने बागायतदार भयभीत झाले. पावसाचा जोर वाढला असून, किनारपट्टीवर पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढली होती. लाटा उसळी घेत असल्याने किनारपट्टीवर ग्रामस्थ सावध झाले होते.तळा तालुक्यात लावणीला सुरुवाततळा : आषाढी एकादशीपासून पावसाने जोरदार बरसणे सुरू केल्याने बळीराजा सुखावला असून, शेतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकºयांनी लावणीला सुरुवात केली आहे. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले होते. शनिवारी जोरदार पावसामुळे शेतात भरपूर प्रमाणात पाणी झाल्याने तळा तालुक्यातील शेतक ºयांनी आपल्या कुटुंबासह शेती लावणीला सुरुवात केली आहे.
पोलादपूर तालुक्यात भातलावणीच्या कामाला वेग, शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:27 AM