पोलादपूरमध्ये मेघगर्जनांसह पाऊस, यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 02:09 AM2019-10-06T02:09:50+5:302019-10-06T02:10:01+5:30
तालुक्यात शनिवारी जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली.
पोलादपूर : परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पोलादपूरमध्ये विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह शनिवारी दुपारी ४ वाजता सुरुवात केल्याने ऐन नवरात्र व दसºयाच्या मुहूर्तावर विरजण पडल्याचे चित्र आज दिसून आले.
तालुक्यात शनिवारी जोरदार पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त पाऊस झाला आहे. गेले तीन-चार दिवस सकाळी गारवा व दुपारी घामाच्या धारांनी त्रस्त नागरिकांना परतीच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त देवीची ओटी भरण्यासाठी महिला सायंकाळी घराबाहेर पडल्याने पावसामुळे त्यांचा हिरमोड झाला. तालुक्यात कापडे, वाकण, रान बाजिरेसह इतर गावागावांत देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशिणी दाखल झाल्या आहेत. पावसामुळे काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.