नवीन पोसरी चौकातील एलईडी हायमास्टसह पोल झाले गायब; कारवाई करण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 12:06 AM2021-03-21T00:06:56+5:302021-03-21T00:07:39+5:30

पंचायत समितीच्या निधीतून उभारणी

The pole with the LED highmast in the new Posari Chowk disappeared; Demand for action | नवीन पोसरी चौकातील एलईडी हायमास्टसह पोल झाले गायब; कारवाई करण्याची मागणी 

नवीन पोसरी चौकातील एलईडी हायमास्टसह पोल झाले गायब; कारवाई करण्याची मागणी 

Next

मोहोपाडा : पंचायत समितीच्या निधीतून वासांबे मोहोपाडा हद्दीतील नवीन पोसरी येथील माउली अपार्टमेंटनजीकच्या चौकात एलईडी हायमास्ट लाइटचा पोल अचानक गायब झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या हायमास्टची वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे देखभालीची जबाबदारी असतानाही असा प्रकार घडल्याने असा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी नागरिक मागणी करीत आहेत. 

रसायनीतील वासांबे मोहोपाडा व नवीन पोसरी हे परिसरातील मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू आहे. नवीन पोसरी येथील माउली अपार्टमेंट चौकात याअगोदर नागरिकांच्या आग्रहाखातीर येथील स्थानिक पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून एलईडी हायमास्ट पोल लावल्याने परिसर प्रकाशमय झाला होता.  पोलची जबाबदारी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे होती. परंतु नुकताच हा पोल गायब झाला आहे. यामुळे रात्री या चौकातून प्रवास करताना महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका परिसरातील नागरिकांना प्रकाश दाखवून दुसऱ्या परिसरातील नागरिकांना अंधारात ठेवणे हे कितपत योग्य? असा सवाल केला जात आहे?  वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने सदर हायमास्ट एलईडी लाइट व पोल चोरणाऱ्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नवीन पोसरी चौकातील हायमास्टची देखभालीची जबाबदारी ही वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे असल्याने हायमास्ट गायब करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे ग्रामपंचायतीकडून रसायनी पोलीस ठाण्याला पत्र देण्यात येईल. -सरपंच ताई पवार

Web Title: The pole with the LED highmast in the new Posari Chowk disappeared; Demand for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.