म्हसळा : शहरातील केवळ १० टक्केच नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारनंतर मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी म्हसळ्यात दिले. हा निर्णय प्रत्येकाच्या आरोग्याचा विचार करूनच घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हसळा तालुक्यातील अधिकाºयांची आढावा सभा न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या वेळी लोकांना कोरोना रोगाबाबत गांभीर्याने पाहण्याचे आवाहन तटकरे यांनी केले. या आढावा बैठकीची आगाऊ सूचना देऊनही उपस्थित न राहिल्याबद्दल डी.एच.ओ.नी त्वरित कारवाई करण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
तसेच निसर्ग वादळातील नुकसानभरपाई, वीज, टेलिफोन, अप्रोच रोड, शाळा दुरुस्ती या विषयांवर संबंधित खातेप्रमुखांना त्वरित पूर्तता करण्याचेही आदेश दिले. येत्या ३ आॅक्टोबर २०२० पर्यंत म्हसळा-श्रीवर्धन तालुक्यातील एकही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये, अशी सूचनाही तटकरे यांनी अधिकाºयांना केली. या सभेला प्रांत अमित शेडगे, जि.प.चे कृषी सभापती बबन मनवे, सभापती उज्ज्वला सावंत, बी.एस.एन.चे जनरल मॅनेजर शर्मा, नगराध्यक्षा जयश्री कापरे, तहसीलदार शरद गोसावी, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे आदी उपस्थित होते.
५०० रुपये दंड
च्मास्क न घालणाºया व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर त्या व्यक्तीला पावती दिली जाईल. त्यामध्ये व्यक्तीचे नाव, दंडाचे कारण, दंड आकारलेली जागा यांचा उल्लेख केला जाईल. मास्क न घालता फिरणाºया नागरिकांवर ५०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारावा. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, नगरपंचायत पालिका कर्मचारी तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.