महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरुन नियमितपणे घडणाऱ्या हाणामारीच्या घटनांना पोलीसयंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना आ. भरत गोगावले यांनी गुरु वारी पत्रकार परिषदेत केला. महाविद्यालयात हाणामारी करणाऱ्यांवर पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली असती तर या घटना टाळता आल्या असत्या. मात्र घटना पोलिसांनी गांभिर्याने घेतल्या नाहीत. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, अशी मागणी देखील आ. गोगावले यांनी यावेळी केली. आ. गोगावले म्हणाले की, या वादावर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी हस्तक्षेप करुन त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी आ. गोगावले यांनी यावेळी केली. यासाठी कुलगुरुंची आपण शुक्रवारी भेट घेणार असल्याचेही गोगावले यांनी स्पष्ट केले. वेळ पडल्यास याप्रकरणी आपण विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर) पोलिसांवर खोटा आरोपबुधवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मचाऱ्यांच्यामध्ये झालेल्या वादात विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खोटा असल्याचा खुलासा डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांनी केला आहे. आवश्यक तेंव्हा वेळो वेळी पोलिसांनी योग्य करवाई केली आहे. पोलिसांवर केला जाणारा आरोप खोटा आहे, असे स्पष्टीकरण सोनावणे यांनी केले.अॅट्रॉसिटीप्रकरणी गुरव यांना अटकडॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. धनाजी गुरव व लिपिक रमेश पाटील यांना अॅट्रॉसिटीप्रकरणी बुधवारी रात्री अटक करण्यात आली. ९ नोव्हेंबरला माजी प्राचार्या आरती वानखेडे यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणाची चौकशी करुन या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली.
‘त्या’ वादाला पोलीसच जबाबदार
By admin | Published: December 04, 2015 12:24 AM