दीड किलो सोन्याची तस्करी करणारा 75 वर्षीय वृद्ध, पोलिसांनी सापळा रचून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:15 PM2019-03-23T22:15:07+5:302019-03-23T22:15:58+5:30
खालापूर पोलीस निरिक्षक विश्वजित काईंगङे यांना खब-याने दिलेल्या गुप्त माहितीनुसार खाजगी प्रवाशी बसमधून सोन्याची तस्करी होत असून सदरची बस मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहे.
वावोशी (अंकुश मोरे ) - सोन्याची तस्करी करणा-या पंच्च्याहत्तर वर्षीय वृद्धाला खालापूर पोलीसानी सापळा रचून खासगी बसमधून ताब्यात घेतले असून सुमारे चव्वेचाळीस लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलीसानी जप्त केले आहेत. गोवा मुंबई व्हाया कोल्हापूरला सोने नेण्यात येत होते.
खालापूर पोलीस निरिक्षक विश्वजित काईंगङे यांना खब-याने दिलेल्या गुप्त माहितीनुसार खाजगी प्रवाशी बसमधून सोन्याची तस्करी होत असून सदरची बस मुंबईहून कोल्हापूरला जाणार आहे. त्यानुसार शुक्रवारी राञीपासून उपविभागिय पोलीस अधिकारी ङाॅ रणजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विश्वजित काईंगङे,सपोनी महेंद्र शेलार,पोलीस नाईक नितिन शेङगे, हेमंत कोकाटे,रणजित खराङे,पोलीस शिपाई समीर पवार,महिला पोलीस भारती नाईक मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खालापूर टोल नाका येथे दबा धरून बसले होते. प्रत्येक खाजगी बसची कसून तपासणी सुरू होती. शनिवारी पहाटे साङेसहाच्या सुमारास कोल्हापूर जाणारी खाजगी बसची तपासणी करताना एका वृद्धाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीसाची त्याच्या सामानाची कसून झङती घेतली असता कपङ्यात लपविलेले सोन्याचे दागिने आढळून आले.
पोलीसानी चौकशी केली असता वृद्धाने समाधानकार उत्तर न दिल्याने त्याला अधिक चौकशी करिता खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले जवळपास 1किलो 471ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने वृद्धाजवळ सापङले असून बाजारभावाप्रमाणे चव्वेचाळीस लाख किंमत आहे.याबाबत पोलीस निरिक्षक विश्वजित काईंगङे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.