रायगड : शाळेतील मुलींना पॉर्न व्हिडीओ पाठवणाऱ्या एका तरुणाला तळा पोलिसांनी गजाआड केले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील मुलींना अज्ञात नंबरवरून व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडीओ क्लिप पाठवण्यात येत होत्या. वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळे एका मुलीने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी ६ मार्च रोजी तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (Police arrested one who send porn videos to girls in raigad)त्या दिवसापासून पोलीस अज्ञात व्यक्तीच्या शोधात होते. व्हॉट्सॲपद्वारे क्लिप पाठवलेली असली तरी ती पाठवताना कुठलेही सिमकार्ड वापरले नव्हते. त्यामुळे शोध घेण्यात पोलिसांना तांत्रिक अडचणी येत होत्या. मोबाइलचे लोकेशन तळेगाव आणि तळा बाजारपेठ बळीचा नाका असे दिसत होते. याच लोकेशनचा आधार घेत रविवारी रात्री पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.अटक असलेल्या तरुणाचे तळा बाजारपेठेत मोबाइल दुरुस्ती तसेच मोबाइल रिचार्जचे दुकान आहे. त्यामुळे दुरुस्ती आणि रिचार्जला आलेल्या मुलींचे मोबाइल नंबर त्याला सहज मिळत होते.
मुलींना पॉर्न व्हिडीओ पाठवणे पडले महागात, तळा पाेलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 8:08 AM